पानिपत:गमावले पण शौर्याने मराठ्यांनी नाव कमावले,मराठा एकाकी पडला,पण अडला,नडला आणि थेट भिडला !!!पानिपत म्हणजे जाज्वल्य अभिमान ! सर्वोच्च कार्यक्षमता !
निर्भय न्यूज लाईव्ह:वृत्त सेवा

पानिपत:गमावले पण शौर्याने मराठ्यांनी नाव कमावले,मराठा एकाकी पडला,पण अडला,नडला आणि थेट भिडला !!!पानिपत म्हणजे जाज्वल्य अभिमान ! सर्वोच्च कार्यक्षमता
ज्यांच्या मातीत देशप्रेम उगवते म्हणतात त्या पंजाब सिंधच्या मातीत सर्वोच्च देशप्रेमाचा कधीच न मिटणारा ठसा महाराष्ट्राने उमटवलाय, त्याचे नाव पानिपत !
🙏 सर्व फोटो सोशल मीडिया साभार…🙏
पानिपत
मराठ्यांच्या पराक्रमाची परमोच्च शौर्यगाथा म्हणून ‘पानिपत’ ची लढाई ओळखली जाते. कुसुमाग्रजांनी तर, महाभारताच्या लढाईसोबत याची तुलना केली आहे. पण आपल्या मनात अजूनदेखील असं झालं असतं तर, तसं झालं असत तर… हे विचार येतात, पण खरंच याला काही अर्थ आहे का? अरे असं-तसं बोलायला, जिथे मराठे दाण्यासाठी मोहताज होते तिथे आपले तर्क काहीच फायद्याचे ठरतं नाहीत. रस्त्यावरचे गवत खाऊन २ दिवस काढता येणार नाहीत तिथे महिनाभर मिळेल ते, मिळेल तेवढंच खाऊन देखील परकीय आक्रमनाशी दोन हात करणं, ते पण दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी घेतली आहे म्हणून..! हे फक्त मराठेच करू शकतात हे पानिपतच्या लढाईने दाखवून दिलंय.
फोटो सोशल मीडिया साभार…
खरं ‘पानिपत’ सुरू होतं ते शौर्य दिनाच्या १ वर्ष आधी बुराडी घाटावर गिलच्यांनी दत्ताजी शिंदेंना मारलं तेव्हापासून..! इकडं महाराष्ट्रात घराघरांत संक्रांतीचा सण होता आणि तिकडे दत्ताजी शिंदे परकीय आक्रमणापासून मातृभूमीला वाचवण्यासाठी अनंतात विलीन झाले.
त्यानंतर सदाशिवरावभाऊसाहेब त्या गिलच्याचा समाचार घ्यायला महाराष्ट्रातीत प्रत्येक उंबऱ्याचा मावळा घेऊन उत्तरेकडे निघतात. वर सोबत मिळतं तर काय बाजार बुणगे, यात्रेकरू… त्यात २ कोटी कर्जात असलेल्या दौलतीवर अजून भार नको म्हणून निर्वाहासाठी लागणारी तजवीज जिकडे जाईल तिकडेच करू असा विचार… यातून एकच निष्पन्न होते, फक्त वेळेला पोटाला आधार जरी मऱ्हाठयांना मिळाला असता तरी पानिपतचा निर्णय वेगळा लागला असता. बाकी कोणी पळून गेले, माघारी वळाले, मदत केली नाही. या गोष्टींनी मराठ्यांना कधीच फरक पडत नाही.
फोटो सोशल मीडिया साभार…..
अठ्ठावीशीतले सदाशिवरावभाऊ वयाने अनुभवाने छोट्या-मोठ्या अनेक सरदारांचे नेतृत्व करत होते. त्यांच्यातला समतोल राखणे ही वेगळीच तारेवरची कसरत, त्यात अनेक आप्तच लाचखोर… त्यांनाही युद्धाच्या ऐनवेळी दुखवता येत नव्हते. अशा परिस्थितीमध्ये परमुलखात भाकरदाण्याची तजवीज करून अनेक महिने शत्रूला तोंड देत हातात आलेले दिल्लीचे तख्त फक्त बंधुप्रेम आणि निष्ठेखातर पुतणे विश्वासरावांच्या हातात देणे, हे सदाशिवराव भाऊंसारखा योद्धाच करू शकतो.
पानिपत असे युद्ध आहे ज्यात लाख मराठा मारला गेला, तरी उपाशी मराठ्यांनी मरायच्या आधी अर्धा दिवस विजयश्री जवळजवळ स्वतःजवळ खेचून आणलीच होती, पण निसर्ग देखील शत्रूचे पारडे जड करत होता…
या युद्धात मराठ्यांच्या ३ पिढया खर्ची पडल्या. ओठावर मिसरूड न आलेल्या पोरांनी पण पराक्रमाची पराकाष्ठा केली. लाख बांगडी फुटली, ३वर्ष मोहिमेवर गेलेले परत कधीच परतून आले नाहीत. जे जगले वाचले ते वेगवेगळ्या मुलखात आजही वास्तव्य करून आहेत.
फक्त एका नजीबामुळे पानिपत घडले. बाकी सर्वांनी आपली भूमिका तत्कालीन परिस्थिती पाहून बदलली, त्यामुळे कोणाला दोष देता येत नाही. अहमदशहा अब्दाली आणि मराठ्यांच्या दरम्यान घडलेलं हे युद्ध बुधवार दिनांक १४ जानेवारी १७६१ या दिवशी घडलं. मध्ययुगीन कालखंडात सकाळी ९ वाजल्यापासून संध्याकाळी ५.३० पर्यंतच्या एका दिवसाच्या अल्पावधीत असं भयंकर, घनघोर, जीवघेणं युद्ध घडल्याचं आणि त्यामध्ये दोन्ही बाजूंची दीड लाख माणसं आणि ऐंशी हजार जनावरं मेल्याचं दुसरं उदाहरण नाही.
सर्व फोटो सोशल मीडिया साभार…..
या युद्धाबद्दल ऐऱ्यागैऱ्यानी तर कधीच बोलू नये. कारण ज्याच्यासोबत मराठे लढले त्या अब्दालीनंच लिहून ठेवलंय, “मराठ्यांनी पानिपतावर युद्धाच्या दिवशी अत्यंत निकरानं आमच्या लष्करावर पुनःपुन्हा हल्ले चढवले. मराठ्यांचं हे असामान्य शौर्य पाहण्यासाठी त्या दिवशी आमचे रुस्तम आणि इस्फिंदार (अफगाण्यांच्या महाकाव्यातील कृष्णार्जुन) सारखे वीर मौजूद असते, तर त्यांनी मराठ्यांचा महापराक्रम पाहून आश्चर्यानं तोंडात बोटं घालून चावली असती! मराठ्यांसारखी युद्धाची अशी लालसा, अशी खुमखुमी आणि इतकं शौर्य इतरांकडून होणं वा दिसणं अशक्य!”
त्यानंतर अब्दालीनेसुद्धा पानिपतची एवढी दहशत खाल्ली की नंतर त्याने हिंदुस्थानवर आक्रमणे केली, तरी तो पानिपतच्या आसपास फिरकला नाही. नजीबाने नंतर दहा वर्षे दिल्लीवर हुकूमशाही गाजवली, पण स्वतःला बादशहा घोषित केले नाही. त्याच्या मृत्यूनंतर महादजी शिंदे अंतर्वेदीत गेले होते, तेव्हा त्यांनी नजीबाचे थडगे उध्वस्त केले. पानिपत हरलो तरी एवढी छाप मराठ्यांनी शत्रू सैन्यावर सोडली होती.
लाख बांगडी फुटली, दोन मोती गळाले, 27 मोहरा हरवल्या आणि चिल्लरखुर्दा किती गेला याची गणना नाही !
याच कारणाने तिळगुळ आम्हाला आजही गोड लागत नाही,
भारतीय इतिहासात अजरामर असलेल्या पानिपतच्या रणसंग्रामाला आज तब्बल ३६४ वर्षे पूर्ण झालीत.
अहमदशाह अब्दालीच्या प्रचंड फौजेशी मावळे प्राणपणाने, उपाशीपोटी लढले.
स्वराज्य आणि स्वधर्माच्या रक्षणार्थ हजारो मराठा वीर योध्दे या निकराच्या लढाईत कामी आले.
१४ जानेवारी १७६१ हा दिवस आम्ही कदापि विसरणे शक्य नाही.
पानिपत.
दीड लाख, मराठी माणसाच्या तीन पिढ्या एका दिवशी एकाच ठिकाणी खच्ची पडल्या.
उभा मराठा कापला गेला. लौकिकार्थाने काळा दिवस म्हणून या दिवसाची नोंद झाली.
‘पानिपत होणे’ हा वाक्प्रचारही रुजला.
युद्ध !
युद्ध म्हटले कि त्याची परिणती विजय किंवा पराभव. पानिपत हा मराठ्यांचा सर्वात मोठा पराभव होता का ?
मराठ्यांचे सैन्य उभे कापले गेले, म्हणून गारद्यांचा विजय आणि मराठ्यांचा पराभव झाला का ?
या युद्धानंतर काय झाले ?
खैबरखिंडीतून झालेले ते शेवटचे आक्रमण.
तीन पिढ्या मराठ्यांच्या गेल्या, पण कणा मोडला तो गनिमांचा ! शतकानुशतकांची परंपरा एका तडाख्यात थांबली.अब्दालीचे कंबरडे मोडले आणि नशिबही.घरी जाऊन तो मेला.
अर्यावार्ताला पुन्हा त्या सुलतानी आक्रमणाला तोंड द्यावे लागले नाही.
हेच तर साधायचे होते या युद्धातून !
साधले ही !
पराभव कुठे झाला !
पानिपत ही मराठ्यांनी देशासाठी दिलेली सवोत्तम आहुती होती.’आहुती म्हणजे देशप्रेम’.
पुन्हा मराठ्यांकडे कोणी देशप्रेमाचे दाखले मागू नयेत !
मराठे एकाकी लढले !
“बचेंगे तो औरभी लढेंगे” म्हणणारे दत्ताजीचे मराठे भुकेल्या पोटी आणि तहानलेल्या ओठी एकाकी लढले. राजपूत, जाट कोणी-कोणी म्हणून कोणी आले नाहीत ! एकवेळ अब्दाली चालेल पण मरहटे नकोत !
एक होऊन लढले नाहीत सगळे,
मराठा एकाकी पडला,पण अडला,
नडला आणि थेट भिडला..!!
पानिपत म्हणजे जाज्वल्य अभिमान.!
सर्वोच्च कार्यक्षमता..
ज्यांच्या मातीत देशप्रेम उगवते म्हणतात त्या पंजाब सिंधूच्या मातीत सर्वोच्च देश प्रेमाचा कधीच न मिटणारा ठसा महाराष्ट्राने उमटवलाय, त्याचे नाव पानिपत मराठा का एकाकी पडला.??
आपल्याविषयी विश्वास निर्माण कराया का कमी पडला ??
का परक्यांपेक्षा तो आपल्यांना अधिक परका वाटला ??
आज या प्रश्नाचे उत्तर शोधले पाहिजे !
महाराष्ट्राला या देशाचे नेतृत्व करायचे असेल, तर अवघ्या देशाचा विश्वास आपण मिळवला पाहिजे. सर्व देशात आदराचे स्थान मिळवले पाहिजे !!
पानिपत म्हणजे दुसऱ्यांवर विजय आणि आपल्याकडून पराभव !!
आपल्याच लोकांमध्ये बेबनाव, आपल्या लोकांमध्ये अविश्वास आणि त्याचा बसलेला खूप मोठा फटका !!
या अर्थी पानिपत एक शिकवण !!
आणि एक गोष्ट तुम्ही नोंद केली असेल.
आम्ही यास लढाई म्हणत नाही,
हे युद्ध !!
महाभारतासारखेच
महत्वाचे !!
मराठ्यांनी गाजवलेल्या पराक्रमाची गाथा,
आपला अभिमान आपले देशप्रेम आपला त्याग,
ज्यावर प्रत्येक मराठ्याला गर्व वाटावा,
आपण न थकता तो सांगावा, देशाला, जगाला !
कारण पानिपत म्हणजे माझ्या राष्ट्राचा हुंकार !
एक पर्व संपले !
आक्रमणाचे, नाचक्कीचे, बलात्कारांचा
इतिहास अभ्यासकांच्या भाषेत,
मध्ययुग संपले आणि
आधुनिक इतिहासास प्रारंभ झाला,
तो दिवस.
१४ जानेवारी १७६१ !
पानिपत!
चला त्या मर्द मराठ्यांच्या हौतात्म्यासमोर नतमस्तक होऊ या.
सार्थ अभिमान आहे आम्हास आमच्या पूर्वजांचा
पानिपत युद्धात हुतात्मा शुरवीरांना ….
शतश: नमन
🙏🏽 🙏🏽 🙏🏽
🚩॥ जय भवानी॥🚩
॥ जय शिवराय ॥
हर हर महादेव …..
हर हर महादेव ……