चिंचोली मोराची येथील उकिरडेमळा भागातील सुमारे वीस ते पंचवीस शेतकरी गेल्या चार-पाच वर्षांपासून शेतीच्या रस्त्याच्या समस्येने त्रस्त आहेत. शिरूर तहसीलदार कार्यालयात वारंवार चकरा मारूनही आणि निकाल लागूनही रस्ता मोकळा होत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. या प्रश्नावर प्रशासनाकडून “तारीख पे तारीख” मिळत असल्याने आता संघर्ष शेतकरी संघटना आणि नवज्योत ग्रामविकास फाउंडेशनच्या माध्यमातून ९ ऑक्टोबर रोजी शिरूर तहसीलदार कार्यालयासमोर ‘घंटानाद’ आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.पोलिस प्रशासनाला निवेदन देताना संघर्ष शेतकरी संघटनेचे पदधिकारी व कार्यकर्ते
रस्ते अडवून एकमेकांची जिरवा: जुनी प्रथा कायम
उकिरडेमळा येथे अनेक वर्षांपासून शेताचे रस्ते अडवण्याची आणि त्यावरून एकमेकांना त्रास देण्याची जुनी प्रथा आजही सुरू असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. या समस्येमुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत असून, शेतीमालाची वाहतूक करणे किंवा शेतात जाणेही अवघड झाले आहे.
या गंभीर समस्येतून मार्ग काढण्यासाठी संघर्ष शेतकरी संघटना आणि नवज्योत ग्रामविकास फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. येत्या ९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या आंदोलनात “शेताला जायला रस्ता द्या” ही प्रमुख मागणी राहणार आहे. या आंदोलनासाठी संघर्ष शेतकरी संघटनेने शिरूरचे तहसीलदार आणि शिरूर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने होणार असून, सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढून रस्त्याचा प्रश्न मार्गी लागेल, अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत.
निर्भय न्यूज लाईव्ह, हे एकमेव निर्भीड न्यूज पोर्टल आहे. निर्भय न्यूज लाईव्ह हे सर्व क्षेत्रातील बातम्या, निर्भयपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहे.अर्थातच आपल्या सर्वांची साथ तितकीच महत्त्वाची आहे.!आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी आपण ८१४९२३२२३५ या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.