रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी डिझेल चोरांच्या टोळीचा केला पर्दाफाश
निर्भय न्यूज लाईव्ह: वृत्तसेवा

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी डिझेल चोरांच्या टोळीचा केला पर्दाफाश
रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी ६ गुन्हे ९५००० रुपयांची डिझेल चोरी आणली उघडकीस.!
निर्भय न्यूज लाईव्ह: वृत्तसेवा
रांजणगाव- दिनांक १५ जानेवारी २५
रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी कार्यतत्परता दाखवत डिझेल चोरांच्या टोळीचा केला पर्दापाश करत ६ गुन्हे व ९५००० रुपयांची डिझेल चोरी उघडकीस आणल्यामुळे अवजड वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अवजड वाहनांच्या डिझेल चोरी करणाऱ्या आरोपींना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी चोरांची धरपकड करत ६ गुन्हे ९५००० रू किमतीचे डिझेल चोरी ही उघडकीस आणली आहे.
आशिया खंडातील पंचतारांकित रांजणगाव एमआयडीसी येथील पोलीस स्टेशन हद्दीतील औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती अवजड वाहनांची आवक-जावक चालू असते. कंपनीमध्ये माल घेऊन आलेली वाहने रात्रीच्या वेळी एमआयडीसी मधील पार्किंग तसेच रोड लगत लावून चालक झोपी जातात. याचाच फायदा घेऊन डिझेल चोर अवजड वाहनातील डिझेल चोरी करून पसार होत होते. अशातच अनेक वाहनांमधील डिझेल चोरीच्या तक्रारी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये आल्या होत्या.
रांजणगाव एमआयडीसीतील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी श्री. महादेव वाघमोडे यांनी पोलिसांच्या तपास पथकाला सदर प्रकरणाच्या बाबत तपास करण्याचे आदेश दिले.
गोपनीय खबऱ्याकडून माहितीच्या आधारे व तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलीस तपास पथकातील सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पिठले, संतोष औटी यांनी सदर गुन्ह्यातील आरोपींच्या बाबत गोपनीय माहिती काढली त्याच्या आधारे आरोपी-
१) रोहन अनिल अभंग, वय २७ वर्ष
२) निखिल पांडुरंग रोकडे, वय २१ वर्ष
दोन्ही राहणार संगमनेर,तालुका संगमनेर,जिल्हा-अहिल्यानगर यांना सदर गुन्ह्याच्या बाबतीत दिनांक ७/१/२०२५ रोजी अटक केली. सदरचे गुन्हे त्यांचे साथीदार
३) वैभव सुरवडे, राहणार-जामखेड जिल्हा-अहिल्यानगर
४) समाधान देविदास राठोड, राहणार कोपरगाव, जिल्हा-अहिल्यानगर
५) सचिन देविदास दाते राहणार -येवला जिल्हा-नाशिक यांनी सदर गुन्हे केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून ९५००० किमतीचे ८०० लिटर डिझेल व २००० रू किमतीची बॅटरी जप्त करण्यात आलेली आहे. रांजणगाव एमआयडीसी औद्योगिक परिसरातील पार्किंग मध्ये तसेच रोड लगत लावण्यात आलेल्या अवजड वाहनांच्या डिझेल टाकीचे लॉक तोडून डिझेल टॅंक मध्ये पाईप टाकून त्यास मोटर लावून डिझेल कॅन मध्ये भरून डिझेल चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल.!
दिनांक ०९/०८/२०२४ रोजी फिर्यादी सागर अरुण टेमगिरे राहणार-पारोडी तालुका-शिरूर जिल्हा- पुणे यांच्या (मातोश्री ट्रान्सपोर्ट) च्या दोन कंटेनर मधून ७२०० रुपये किमतीचे डिझेल चोरी गेले. प्रकरणी रजिस्टर नंबर ४७९/२०२४ भारतीय न्याय संहिता कायदा कलम ३०३,३२४,(२) अन्वये दिनांक ०९/०८/२०२४ रोजी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी विकास अनिल मलगुंडे राहणार डोकसांगवी तालुका-शिरूर जिल्हा-पुणे संदीप शामराव राऊत, बापूराव नानाभाऊ कावळे,साहिल सुनील गावडे, यांच्या फिर्यादीवरून वेगवेगळे पाच डिझेल चोरीचे गुन्हे इतर आज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
सदरची कामगिरी माननीय पंकज देशमुख पोलीस अधीक्षक, पुणे.माननीय- रमेश चोपडे अप्पर पोलीस अधीक्षक, पुणे.श्री प्रशांत ढोले उपविभागीय पोलिस अधिकारी, शिरूर. उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे साहेब पोलीस दत्तात्रय शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, पोलीस कॉन्स्टेबल योगेश गुंड, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पिठले, पोलीस हवालदार संतोष औटी, पोलीस हवालदार विलास आंबेकर यांनी केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार गुलाब येळे, पोलीस हवालदार विजय सरजने,पोलीस हवालदार ढगे, पोलीस हवालदार तेजस रासकर, रांजणगाव पोलीस स्टेशन हे करत आहे.