महाराष्ट्र शासनाने राज्याच्या युवा धोरणासाठी तयार केलेल्या विशेष समितीवर ॲड. संग्रामसिंह नाथाभाऊ शेवाळे यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. लंडनमधून कायद्याचे उच्च शिक्षण घेतलेले ॲड. शेवाळे यांनी भारतात परतल्यानंतर शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात विविध राज्यव्यापी उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. ते विद्यार्थी, युवक आणि समाजातील इतर घटकांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करत आहेत.
या नियुक्तीबद्दल ॲड. संग्राम शेवाळे यांनी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री मा. माणिकराव कोकाटे यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले.
यावेळी बोलताना ॲड. शेवाळे म्हणाले, “या समितीच्या माध्यमातून युवकांसाठी शिक्षण, रोजगार, क्रीडा, सामाजिक नेतृत्व आणि आत्मनिर्भरतेसाठी नवनवीन आणि प्रभावी मार्ग शोधण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहील. महाराष्ट्रातील तरुणांची स्वप्ने साकार करण्यासाठी, त्यांना योग्य संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी एक उत्तम धोरण तयार करण्याकरिता मी कटिबद्ध राहीन.” त्यांच्या या विधानातून युवकांच्या कल्याणासाठी काम करण्याची त्यांची तीव्र इच्छा दिसून येते. ही नियुक्ती राज्याच्या युवा धोरणाला एक नवीन दिशा देईल अशी अपेक्षा आहे.
निर्भय न्यूज लाईव्ह, हे एकमेव निर्भीड न्यूज पोर्टल आहे. निर्भय न्यूज लाईव्ह हे सर्व क्षेत्रातील बातम्या, निर्भयपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहे.अर्थातच आपल्या सर्वांची साथ तितकीच महत्त्वाची आहे.!आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी आपण ८१४९२३२२३५ या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.