संपादकीय
Trending

कुळवाडीभूषण, स्वराज्यसंस्थापक, शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त महाराजांच्या अलौकिक कार्यकर्तृत्वास विनम्र अभिवादन..! 🙏 🚩 शिव जन्मापूर्वीचा इतिहास..

निर्भय न्यूज लाईव्ह: वृत्तसेवा

ताज्या घडामोडी मोबाइल वर मिळवा.फोटो वर क्लिक करा

शिवछत्रपती शिवाजी महाराज यशोगाथा… शिव जन्मापूर्वीचा इतिहास..

शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात सामाजिक,आर्थिक न्याय व रयतेस विचार,उपासना याचे स्वातंत्र्य व संधीची समानता होती. छत्रपतीनि केवळ स्वराज्य उभे न करता स्वराज्य राखणारी या मातीतील मावळे तयार केले.येथील मावळ्यांमध्ये स्वराज्य कसे उभे करायचे,ती भावना तयार केली.स्वराज्य हे राजासाठी नाही, स्वराज्य हे कोणा व्यक्ती साठी नाही,स्वराज्य हे तत्वासाठी आहे हे रुजवले..!!

(स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज सर्व फोटो सोशल मीडिया साभार)   

–||—शिवजन्म पूर्वीचा इतिहास –||–

शिवछत्रपती शिवाजी महाराज यशोगाथा… शिव जन्मापूर्वीचा इतिहास..!!

शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात सामाजिक,आर्थिक न्याय व रयतेस विचार,उपासना याचे स्वातंत्र्य व संधीची समानता होती. छत्रपतीनि केवळ स्वराज्य उभे न करता स्वराज्य राखणारी या मातीतील  मावळे तयार केले.येथील मावळ्यांमध्ये स्वराज्य कसे उभे करायचे,ती भावना तयार केली.स्वराज्य हे राजासाठी नाही, स्वराज्य हे कोणा व्यक्ती साठी नाही,स्वराज्य हे तत्वासाठी आहे हे रुजवले.

त्या काळात महाराष्ट्रात वेग वेगळ्या शाह्या राज्य करत होत्या.

अगदी भारताचा माहितीचा प्राप्त इतिहास साधारण:सिकंदराच्या स्वारी पासून सुरू होतो. परकीयाच्या स्वारी पासून बचाव करणारे चाणक्य,चंद्रगुप्त त्यानंतर होनाची, कुशाणाची जी काही आक्रमन झाली,त्याला थोपवणारे यशोधर्मा , विक्रमादित्य यांच्या कर्तृत्वाला मोठा नमस्कार करतांना आपण लक्षात घेतले पाहिजे की, इथपर्यंत ची आक्रमणे राजकीय होती. सत्ता , संपत्ती मिळवण्यासाठी,राज्य मिळवण्यासाठी झालेली आक्रमण होती.

इसवी.सन.७११ नंतर झालेल्या आक्रमणांचा धार्मिक आचार – विचारावर गदा आली. आक्रमण करताना सत्ता हा महत्त्वाचा मुद्दा न ठेवता ही भूमी आपल्या धार्मिक ध्वजाच्या खाली राहण्यासाठी वाटेल ते अत्याचाराचे कळस करण , अशा महाक्रूर गोष्टींनी इसवी सन.७११ पर्यंतचा इतिहास भयानक दिसतो आहे.

     तत्कालीन राजे शौर्यला कोठेही कमी पडले नाही. तत्कालीन भारतीय धार्मिक संरचनेने परकीय आक्रमणकर्त्यांची सत्ता राखायला मदत केली. परकीय आक्रमण करताना सापडलेले आपले लोक सुटून परत येत होते,पण आपल्याच धार्मिक संरचनेच्या व्यवस्थेने त्यांना येण्यासाठी दारे बंद केली. इतिहासात डोकावताना आपल्याला असे दिसेल की, इसवी.सन ७०० साल,९०० साल, इथपर्यंत परकीय आक्रमणकर्त्यांच्या स्वाऱ्या येत राहिल्या. आपले राज्यकर्ते व जनता या आक्रमणकर्त्यांच्या स्वाऱ्याना तोंड देत राहिली.पण इसवी.सन.११०० मध्ये घोरीची स्वारी झाली ती निर्णायक स्वारीनंतर दिल्लीच्या तक्तावर मोगल साम्राज्याची सत्ता स्थापन झाली त्यानंतर ती सत्ता जवळ जवळ हजार ते पंधराशे वर्ष कायम राहिली.

(विजयनगरचे साम्राज्य फोटो सोशल मीडिया साभार)

इतिहास अभ्यासकांच्या मते घोरीनंतर अल्लाउद्दीन खिलीजी सगळ्यात मोठा इतिहास आक्रमण करता.१२ व्या शतकाच्या अखेरीला महाराष्ट्रावर त्याने आक्रमण केले त्यावेळी महाराष्ट्र प्रांतावर देवगिरीचा राजा रामदेवराय व त्यांचा भाऊ शंकरदेवराय चे राज्य होते. देवगिरीचा विध्वंस केला देवगिरीचा तत्कालीन राजा रामदेवराय व शंकरदेवराय यांनी निकराचा लढा दिला.१३ व्या शतकापर्यंत आक्रमण कन्याकुमारी पर्यंत पोहचले.त्या काळातील आपल्या येथील शासन कर्त्याचा बेसावधपणा कारणीभूत ठरला. त्या काळात नामदेव महाराजांसारखे संत महात्मे होऊन गेले. नामदेव महाराजांनी ३० वर्ष पंजाब प्रांतात समाज घडविण्याचे काम केले. भारतातील शासनकर्ते कायमच बेसावध होते असे नाही.

(विजयनगर साम्राज्य फोटो सोशल मीडिया साभार)

——||- विजयनगरचे समृद्ध साम्राज्य –|| ——

   भारतीय शासनकर्त्यांनी वेळोवेळी परकीय आक्रमणकर्त्याना तोंड देत आपल्या शूर लोकांकडून स्वतःचे साम्राज्य १४ व्या शतकाच्या अखेरीला पुन्हा उभे केले. दक्षिणेमध्ये एक हिंदू साम्राज्य पुन्हा उभे राहिले. ज्याला विजयनगरचे साम्राज्य म्हणतात. हे करणारे निर्माण करणारे हरिहर आणि बुक्कराय आपले साम्राज्य वैभवला पोचविले की, ज्यामध्ये कला, विज्ञान, संस्कृतीचा परमोच्च गाठला गेला. भारतीय संस्कृतीचे अप्रतिम शिल्प झाली. अप्रतिम ग्रंथ झाले. संगीत,नृत्य या सर्वांमध्ये विजयनगरचे साम्राज्य समृद्ध होते. विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय कल्याणकारी राजवटीबद्दल प्रसिद्ध आहे.शृंगेरी पिठाचे प्रमुख विद्यारण्य स्वामी यांनी त्याकाळी हिंदूंच्या अनेक पोट जातींना एकत्र करण्याचे काम केले, कोणीही कोणाचा द्वेष करायचा नाही कारण कोणताही हिंदू हा पंचायतन पूजा करतो. शिव, विष्णू ,गणपती ,शक्ती सूर्य म्हणजेच आपली कुलदेवता आहे अशी शिकवण देऊन सर्व पोट पंथांना एकत्र ठेवण्याचे काम त्यांनी केले. विजयनगरच्या साम्राज्यामध्ये सर्व धर्माचा सन्मान केला जाई.

 

— ||- हसन गंगू बहमनी या सरदारांकडून पाच शहांची निर्मिती — || —

     त्याकाळी हसन गंगू बहमणी या सरदाराणे पाच शाह्या निर्माण केल्या याआदिलशाही,निजामशाही,कुतुबशाही,इमामशाही, परीटशाही याचे महाराष्ट्र , कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या विविध भागावर राज्य होते.

     महाराष्ट्राचा बराचसा भूभाग अहमदनगरचा निजामशहा व विजापूरचा आदिलशहा या दोन सुलतानांनी वाटून घेतला होता.

हे सुलतान मनाने उदार नव्हते.ते सुलतान प्रजेवर जुलूम करत होते.या दोघांचे एकमेकांशी हाडवैर होते.त्यात रयतेचे हाल होत होते.रयत सुखी नव्हती,उघड उघड सण उत्सव साजरे व पूजा अर्चा करण्यास मनाई होती. रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते.सगळी कडे अन्याय/ हाहाकार माजला होता.

–||– वेरूळचे भोसले घराणे –||–

    त्याकाळी वेरूळ गावची पाटील बाबाजीराजे भोसले यांच्याकडे होती. बाबाजीराजे भोसले यांना मालोजीराजे व विठोजीराजे भोसले ही मुले होती. मालोजीराजे भोसले हे थोर शिवभक्त होते. वेरूळच्या लेण्या जवळचे शिवमंदिर मोडकळीस आले होते ते मंदिर म्हणजेच घृष्णेश्वराचे मंदिर मंदिराला अवकाळा आली होती. त्या पडक्या मंदिरात शिवभक्त मालोजीराजे भोसले नित्यनियमाने येत असे हात जोडून आपल्या मनातले “श्री शिवाला” सांगत असे, घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार मालोजीराजे भोसले यांनी केला.

    मालोजीराजे व विठोजीराजे मोठे कर्तबगार होते. त्यांच्याकडे पुष्कळ हत्यारबंद मराठी सैन्य होते. तो काळ मोठा धामधुमीचा होता. निजाम शाहीवर उत्तरेच्या मुघल बादशहाने स्वारी केली होती. त्याकाळी दौलताबाद निजामशाहीची राजधानी होती. निजामशाह ने मालोजीराजाची कर्तबगारी पाहिली, त्यांच्या कर्तबगारीची वाखणी(प्रशंसा) केली व त्यांना पुणे व सुपे परांगण्याची जहांगिरी दिली. मालोजीराजांची उमाबाई या पत्नी या उभयंताना  दोन मुले होते.एकाचे नाव “शरीफजी” व दुसऱ्याचे “शहाजी”. शहाजीराजे पाच वर्षाच्या असताना इंदापूरच्या लढाईत मालोजीराजे यांना वीरमरण आले. विठोजी राजेंनी आपल्या पुतण्यांचा व जहागिरीचा सांभाळा केला. पुढे त्यांनी शहाजीराजांसाठी लखुजीराव जाधवांच्या मुलीला मागणी घातली. लखुजीराव जाधवांची लेक जिजाबाई मोठ्या सुलक्षणी होत्या. जिजाबाईंसाठी विठोजींची मागणी लखोजीराव जाधवाणी  स्वीकारली. “लखुजीराव जाधव” म्हणजे निजामशाहीतील एक शूर व पराक्रमी सरदार होते, त्यांनी शहाजीराजे व जिजाबाई यांचा विवाह मोठ्या थाटामाटात लावून दिला.

(स्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसले फोटो सोशल मीडिया साभार)

        —-||– शहाजीराजांची कर्तबगारी –||—-

     निजामशहाणे मालोजीराजांची जहागिरी शहाजीराजांना दिली. शहाजीराजे पराक्रमी होते. निजामशाही दरबारात त्यांना मोठा सन्मान होता. त्याकाळी मुघल बादशहाने निजामशाही जिंकण्याचा बेत आखला  होता. विजापूरचा आदिलशहा ही त्याला येऊन मिळाला होता, तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी शहाजीराजे भोसले व मलिक अंबर निकराने लढले. त्यांनी मुघल व आदिलशाही फौजेवर आक्रमण करून त्यांचा पराभव केला. “शहाजीराजे भोसले” यांचा निजामशाहीमध्ये शूर सेनानी म्हणून लौकिक वाढला. शहाजीराजे भोसले यांची प्रतिष्ठा व लौकिक पाहून मलिक अंबरलाही असूया निर्माण झाली. या दोघांमधील वितुष्ट वाढून शेवटी शहाजीराजांनी निजामशाही सोडली. मुघलांच्या निजामशाही वर कारवाया वाढल्या. मलिक अंबर मृत्यू पावला. निजामशाहीच्या आईने शहाजीराजांना निजामशाहीत येण्यासाठी साकडे घातले. पुढील भागात आपण पाहूया शिवजन्म ते स्वराज्याचे सुराज्य…..!!!

(फोटो सोशल मीडिया साभार)

(विशेष टीप : सर्व माहिती संकलन इतिहासाचे पुस्तके व सोशल मीडिया माध्यमातून)

शेअर करा

मुख्य संपादक- श्री.अनिल डांगे

निर्भय न्यूज लाईव्ह, हे एकमेव निर्भीड न्यूज पोर्टल आहे. निर्भय न्यूज लाईव्ह हे सर्व क्षेत्रातील बातम्या, निर्भयपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहे.अर्थातच आपल्या सर्वांची साथ तितकीच महत्त्वाची आहे.!आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी आपण ८१४९२३२२३५ या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये