राजकीय
Trending

आम् आदमी पार्टी ला टक्कर देण्यासाठी, दिल्लीत रालोआ लढणार.

निर्भय न्यूज लाईव्ह:वृत्त सेवा

ताज्या घडामोडी मोबाइल वर मिळवा.फोटो वर क्लिक करा

आम् आदमी पार्टी ला दिल्ली विधानसभा निवडणूकीत टक्कर देण्यासाठी, दिल्लीत रालोआ लढणार.

 

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम् आदमी पार्टी आणि भाजपा मध्ये काटे की टक्कर पहावयास; मिळणार असून दिल्ली विधानसभा मध्ये सत्ताधारी आम आदमी पार्टी आपल्या लोकप्रिय योजनेमुळे सत्तेत असून या लोकप्रिय योजनेची कॉपी आता अनेक पक्ष करत आहेत.

आम आदमी पक्षाने आपल्या पार्टीच्या नावातील आम् आदमी ना म्हणजेच सर्वसामान्य नागरिकांना डोळ्यासमोर ठेवत, सर्वसामान्य नागरिकांना च्या फायद्याच्या अनेक योजना राबवत, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी देत, पैसे नसले तरीही, आपल्या कामाच्या जोरावर निवडणुका जिंकता येतात असा देशाला एक आदर्श घालून दिला आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे सर्वच राजकीय पक्षाकडून तयारी सुरू असली तरी प्रामुख्याने लढत ही आम आदमी पार्टी व भाजप यांच्यामध्ये असणार आहे त्यामुळेच भाजपाने आता रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांपूर्वीच आम आदमी पार्टीने दिल्ली विधानसभेच्या आपल्या सर्वच उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या सर्वच जागा आपल्याकडे खेचून आणण्यासाठी भाजपाने रणनीती आखली आहे.

त्या रणनीतीचा एक भाग म्हणून दिल्ली विधानसभा भाजप नव्हे, रालोआ (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) लढवणार असे सांगण्यात येत आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या माध्यमातून आम आदमी पार्टीला कडवी टक्कर देण्याची तयारी केली आहे. भाजपने अद्याप उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. त्यामुळे भाजप आता मित्र पक्षांसोबत दिल्ली विधानसभा निवडणूक लढू शकते. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने जेडीयु ला दोन जागा आणि लोक जनशक्ती पक्षाला एक जागा दिली होती.

नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी च्या बैठकीत दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मित्र पक्षांनी ही जागांची मागणी केली आहे. एकत्रित निवडणूक प्रचारासाठी व निवडणुकीच्या रणनीतीवर ही चर्चा झाली. दिली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने मित्र पक्षांच्या प्रमुख नेत्यांना आमंत्रित केले आहे.

काही दिवसापूर्वी झालेल्या महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा विजया बद्दल अभिनंदन करण्यात आले. एनडीएच्या घटक पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवली त्या झारखंड मधील पराभवाचा उल्लेखही करण्यात आला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, केंद्रीय मंत्री जितेंद्र मांझी, चिराग पासवान इत्यादी दिल्ली विधानसभेमध्ये इंडियाचा प्रचार करू शकतात.

दिल्ली विधानसभा मध्ये महाराष्ट्र, बिहार, पूर्व उत्तर प्रदेश, झारखंड, दक्षिण भारत या परिसरातील नागरिकांची मतदानाची टक्केवारी पाहता, एकनाथ शिंदे, नितीश कुमार, जितनराम मांझी,चंद्राबाबू नायडू दिल्ली विधानसभा मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा प्रचार करताना दिसतील.

गेल्या  काही दिवसापूर्वी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीच्या मताांमध्ये विभागणी होऊ नये म्हणून आपला एकही उमेदवार उभा न करता इंडिया आघाडीच्या प्रचारासाठी दिल्लीतले आम आदमी पार्टीचे स्टार प्रचारक प्रचारासाठी आले होते. त्यामुळे इंडिया आघाडीचे महाराष्ट्रातील प्रमुख नेतेे ही आम आदमी पार्टीच्या प्रचार सभेमध्ये स्टार प्रसारक म्हणून दिसू शकतात. दिल्ली विधानसभा मतदारसंघातील नागरिक कोणाच्या बाजूने कौल देतात हे पाहणे मोठे औत्सुक्याचे असणार आहे.

शेअर करा

मुख्य संपादक- श्री.अनिल डांगे

निर्भय न्यूज लाईव्ह, हे एकमेव निर्भीड न्यूज पोर्टल आहे. निर्भय न्यूज लाईव्ह हे सर्व क्षेत्रातील बातम्या, निर्भयपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहे.अर्थातच आपल्या सर्वांची साथ तितकीच महत्त्वाची आहे.!आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी आपण ८१४९२३२२३५ या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये