राज्यात थंडीचा कडाका वाढला..
निर्भय न्यूज लाईव्ह: प्रतिनिधी

- पुणे ९ डिसेंबर २४
- राज्यात थंडीचा कडाका वाढला.
पुण्यात १२ अंश सेल्सिअस तापमानाचे नोंद
महाराष्ट्र मध्ये थंडीची लाट आली असून पुण्यामध्ये १२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद हवामान विभागाकडून घेण्यात आली आहे. महाराष्ट्र मध्ये थंडीचा कडाका वाढला असून येत्या दोन दिवसात तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. महाराष्ट्रामध्ये सोमवारी (दि.९) नाशिक मध्ये आतापर्यंत निशांकी ९.४ सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्या खालोखाल पुण्यात १२ अंश सेल्सिअस पर्यंत तापमान खाली घसरले असल्याची नोंद हवामान शास्त्र विभागाने घेतली आहे.
महाराष्ट्रामध्ये हवामान बदलामुळे कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे किमान व कमाल तापमानात वाढ झाल्याने थंडीचा जोर कमी झाला होता, तर ढगाळ वातावरणामुळे उखडा वाढला होता. येणाऱ्या काही चार-पाच दिवसांमध्ये जम्मू काश्मीर, पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तराखंड भागामध्ये थंडीची लाट येणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. थंडीची लाट येण्याची शक्यता असल्यामुळे गेल्या २४ तासात कमाल व किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे राजासह पुण्यामध्ये थंडी परतणार आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रामध्ये गारठा वाढत चालला आहे.