
शिरूर – हवेलीत भीती आणि धाकधूक.. गड कोन राखणार..?
मतदारांनी मतदानरुपी दान उमेदवारांच्या पारड्यात टाकल्यानंतर शिरूर – हवेलीतील उमेदवारांमध्ये भीती आणि धाक-धूक वाढली आहे.प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्याकडून आमचाच उमेदवार कसा निवडून येणार याबाबत अंदाज बांधले जात आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी शिरूर – हवेलीतील प्रचारादरम्यान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी विद्यमान शरद पवार गटाचे आमदार विरोधी केलेले वक्तव्य निवडूनच कसा येतो..! मी बघतोच ..! हे खरे ठरणार की लोकसभेची पुनरावृत्ती पुन्हा होणार..! हे येणाऱ्या २३ नोव्हेंबर रोजी समजेल.
शिरूर – हवेलीत दुपारनंतर मतदानासाठी लागल्या रांगा
शिरूर-हवेलीत सकाळी मतदानाच्या सुरुवातीला मतदारांनी पाठ फिरवली होती. परंतु दुपारी बारानंतर मात्र ही गती वाढली होती. दुपारी तीन नंतर शुकशुकाट असलेल्या केंद्रावर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शिरूर – हवेलीत सकाळी सात वाजता मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू झाली होती. सकाळच्या सत्रात मतदारांचा उत्साह कमी होता. त्यामुळे सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत ४.२७ % एवढेच मतदान झाले. सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत १४.४४ % एवढेच मतदान झाले. दुपारनंतर मतदान केंद्रावर मतदारांचा मतदानाबाबत उत्साह सर्वत्र पाहावयास मिळाला. दुपारी तीन नंतर मतदान केंद्रावरची टक्केवारी तब्बल ४३.६० टक्केवारी पर्यंत गेल्याचेव पाहावयास मिळाले.
विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार अशोक पवार यांनी सकाळी सात वाजता त्यांच्या वडगाव रासाई कुटुंबीयासह मतदान केले. तर महायुतीचे उमेदवार माऊली आबा कटके यांनी त्यांच्या वाघोली या गावी मतदानाचा हक्क बजावला आहे. सर्वच उमेदवारांनी मतदारांना मतदान करण्यास यावे असे आवाहन केले होते.
दुपारी बारानंतर नागरिक मतदानासाठी बाहेर पडल्याने मतदान केंद्रावर मोठ्या रांगा लागल्या होत्या. पुरुषांसह महिलाही मोठ्या संख्येने मतदानासाठी आल्या होत्या. मतदारसंघातील अनेक मतदार काही आशेने घरातून बाहेर पडले नव्हते. मतदारांना मतदान केंद्रा पर्यंत आणण्यासाठी महायुती व महाविकास आघाडी यांनी जय्यत तयारी करून सुद्धा मतदार बाहेर पडत नाही म्हटल्यावर उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना मोठीच कसरत करावी लागली. प्रत्येक निवडणुक केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त पहावयास मिळाला. त्यांच्या मदतीला काही शाळकरी मुले सुद्धा मतदारांना मोबाईल मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाऊ नका म्हणून विनंती करताना दिसली. मतदारांना मतदान केंद्रावर मोबाईल फोन घेऊन जाण्यास मनाई होती. तरीही काही मतदार चोरी छुप्या पद्धतीने मोबाईल फोन घेऊन जात होते.
मतदान केंद्रा पासून 200 मीटर परिसरात कोणत्याही वाहनाला प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे पोलीस व मतदार यांच्यात वाद होत होते.
प्रत्येक मतदान केंद्रात वृद्ध व अपंग व्यक्तीसाठी व्हील चेअर ची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच मतदार कक्ष व व्यवस्था केल्याने मतदारांची चांगलीच सोय होत होती.
दुपारी तीन वाजल्यापासून मतदान केंद्रावर सर्वत्र रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत होते. पहिल्यांदाच मतदार करणाऱ्या तरुण तरुणींच्या चेहऱ्यावर लोकशाहीसाठी मतदान केल्याचे समाधान व वेगळाच आनंद दिसत होता. शिरूर हवेलीतील उमेदवारांचे कार्यकर्ते मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करीत मतदानाचे वेळ संपल्यावर ही शिरूर हवेली मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब व जनतेच्या आशीर्वादाने मी मोठ्या मताधिक्याने ही निवडणूक जिंकणार आहे, शरदचंद्र पवार साहेब व जनता जनार्दन माझ्या जीवनातील खरे शिल्पकार आहेत.
– अशोक पवार, आमदार महाविकास आघाडी
मी सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. आई-वडील व मतदार संघातील वडीलधारी मंडळी, माय माऊलींचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. उज्जैन महाकालेश्वर व जनता यांच्या आशीर्वादाने माझा विजय नक्की असून गुलाल आम्ही उधळणार आहोत.
– माऊली आबा कटके महायुती उमेदवार