ताज्या घडामोडी
Trending

नवीन निमानुसार डिजिटल पद्धतीने रेशन कार्ड शिवाय नागरिकांना रेशन मिळणार. 

निर्भय न्यूज लाईव्ह: वृत्तसेवा 

ताज्या घडामोडी मोबाइल वर मिळवा.फोटो वर क्लिक करा

नवीन निमानुसार डिजिटल पद्धतीने रेशन कार्ड शिवाय नागरिकांना रेशनमिळणार.

निर्भय न्यूज लाईव्ह: वृत्तसेवा

नवीन नियमानुसार आता नागरिकांना रेशन घेण्यासाठी कार्ड दाखवण्याची गरज लागणार नाही. डिजिटल पद्धतीने रेशन कार्ड शिवाय नागरिकांना रेशन मिळणार आहे.

सरकारने रेशन मिळवण्यासाठी ॲप लाँच केले आहे. ‘ मेरा राशन २.०’ हे ॲप वापरून आता नागरिकांना रेशन मिळणार आहे. नागरिकांना रेशन घेण्यासाठी रेशन कार्ड सोबत बाळगण्याची आता गरज भासणार नाही. नागरिकांना ‘ मेरा राशन २.०’ हे ॲप द्वारे अन्न धान्य सहज मिळू शकणार आहे. केंद्र सरकार दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना स्वस्त दरात रेशन पुरवते. आतापर्यंत या लोकांना रेशन मिळवण्यासाठी रेशन कार्ड दाखवावे लागत होते.

भारत सरकारच्या मेरा राशन २.० या ॲपचा मजुरांना मोठा फायदा होणार आहे. कारण ते अनेकदा कामाच्या शोधात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत असतात.या ॲपच्या मदतीने ते कोणत्याही शहरात काम करत असले तरी त्यांना त्यांचे रेशन सहज मिळू शकेल. नागरिकांचे रेशन कार्ड प्रत्येक कुटुंबाचे महत्त्वाचे दस्तऐवज आहे. अनेक वेळा लोकांना ते कसे अपडेट करायचे असा प्रश्न पडतो. सरकारी कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे रेशन कार्ड मिळवण्यासाठी मोठा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागतो, मात्र आता रेशन कार्ड काढण्यासाठी सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. आता तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून तुमचे नाव रेशन कार्ड मध्ये जोडू शकता.

नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे लागतात. यामध्ये तुम्हाला ओळखपत्र (पॅन कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट) रहिवासी प्रमाणपत्र (विज बिल, टेलिफोन बिल, वोटर आयडी) कुटुंबाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, स्व घोषणापत्र, चौकशी अहवाल ही कागदपत्र लागतात.

मेरा राशन २.० ॲप खालील पद्धतीप्रमाणे वापरावे.!

•गुगल प्ले स्टोअर ॲप किंवा एप्पल स्टोअर्स वरून हे ॲप डाऊनलोड करावे

•मेरा राशन २.० ॲप इंस्टॉल केल्यानंतर आधार क्रमांक, फोन नंबर यासारखे आवश्यक माहिती भरणे आवश्यक आहे 

•ओटीपी पडताळणीसाठी, तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर प्राप्त झालेला आहे ओटीपी भरावा. 

•यानंतर तुमच्या रेशन कार्ड ची डिजिटल कॉफी ओपन होईल. ही डिजिटल प्रत दाखवून तुम्हाला रेशन सहज मिळू शकेल.

शेअर करा

मुख्य संपादक- श्री.अनिल डांगे

निर्भय न्यूज लाईव्ह, हे एकमेव निर्भीड न्यूज पोर्टल आहे. निर्भय न्यूज लाईव्ह हे सर्व क्षेत्रातील बातम्या, निर्भयपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहे.अर्थातच आपल्या सर्वांची साथ तितकीच महत्त्वाची आहे.!आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी आपण ८१४९२३२२३५ या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये