
दिल्ली विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू असून आम आदमी पार्टी ची पहिली यादी जाहीर
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने आपली तयारी सुरू केली आहे. पुढच्या आठवड्यात म्हणजेच २८ नोव्हेंबर पर्यंत निवडणूक आयोगाने मतदार यादी मधील नाव नोंदणी, नाव काढणे आणि बदल यासाठी वेळ दिला आहे. याच्यानंतर ६ जानेवारी २०२५ पर्यंत मतदार यादी मध्ये बदल केल्यानंतर प्रदर्शित केली जाणार आहे. म्हणजेच फेब्रुवारी अगोदर निवडणूक होण्याची बिलकुल शक्यता नाही.
दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल जी यांच्या घरी गुरुवारी मीटिंग झाली. मीटिंगचा अजेंडा होता येणारी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी. त्यात झालेल्या महाराष्ट्र आणि झारखंड मतदान प्रक्रियेनंतर सर्वांची नजर 23 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदान मोजणी प्रक्रियेवर आहे. यामध्येच आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल जी यांनी दिली विधानसभा निवडणुकी संदर्भात विरोधी पार्टीच्या अगोदर दिल्ली विधानसभेसाठी उमेदवार मैदानात उतरवयास सुरू केल्यामुळे विरोधी गटात एकच खळबळ माजली आहे. हा विषय राजनीतिक असला तरी प्रश्न हा आहे की दिल्ली विधानसभा निवडणूक ची तारीख लवकरच घोषित होणार का ? यामुळेच आम आदमी पार्टीने आपली उमेदवार विधानसभा मैदानात उतरवयास सुरू केले आहे का?
कधी होणार निवडणूक, काय आहे मागचा अनुभव:
खरंतर २०२० मागच्या वेळेस निवडणुकीची घोषणा ६ जानेवारी झाली होती. सकाळी मतदार यादी जाहीर झाल्यानंतर संध्याकाळी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली होती.त्यावेळेस मतदान ८ फेब्रुवारी झाले व मतमोजणी ११ फेब्रुवारी झाली होती. त्याच्या पाच वर्षे अगोदर २०१५ ला सुद्धा मतदान फेब्रुवारी मध्येच झाले होते. २०१५ व २०२० मध्ये दोन्ही वेळेस मतदान कधी होणार यांची प्रसिध्दी १४ जानेवारी घोषित झाली.त्यातच या वेळेच्या निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल जी यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा सुरू केली आहे. परंतु आता ही निवडणुकीची तारीख अडीच महिने पुढे आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दिल्लीमधील लोकांनी पक्षाला सल्ले द्यावेत यासाठी टोल फ्री क्रमांक जाहीर करणार: भाजपा समिती सदस्य नीतू डब्बास
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकांनी सल्ले द्यावेत, यासाठी टोल फ्री क्रमांक आणि ईमेल आयडी लवकरच जारी केला जाणार असल्याचे समितीच्या सदस्य नीतू डबास यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आम आदमी पार्टी सरकारच्या खराब प्रशासन व्यवस्थेमुळे लोक नाराज असून लवकरच परिवर्तन होणार, या सरकारला दिल्लीमधील मतदार त्रस्त आहेत. त्यामुळे लोकांनी दिलेल्या सल्ल्याच्या आधारे जाहीरनामा तयार केला जाणारा त्याची माहिती नीतू डब्बास यांनी दिली. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीरनामा समितीची स्थापना केली असून या समितीत अनेक भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. भाजपाचे खासदार रामविर सिंह बिधुडी यांना या समितीचे संयोजक अध्यक्ष बनविण्यात आले आहे. भाजपाचे खासदार रामवीर सिंह बिधूडी यांच्या निवासस्थानी झालेल्या समितीच्या पहिल्या बैठकीस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस दुष्यंत गौतम हे उपस्थित होते. समितीच्या माध्यमातून आप सरकारचे खराब धोरण व असफलता लोकांपर्यंत पोहोचवले जाणार असल्याचे सांगण्यात आले.