निवडणुकीच्या तोंडावर सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन: सर्वसामान्यांच्या स्वयंपाक घरातून लसूण गायब
निर्भय न्यूज लाईव्ह: प्रतिनिधी

निवडणुकीच्या तोंडावर सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन: सर्वसामान्यांच्या स्वयंपाक घरातून लसूण गायब
सर्वसामान्यांच्या घरातून लसून गायब: लसणाची फोडणी महागली
निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन, निवडणुकीचे वातावरण तापू लागले असताना, दुसरीकडे महागाई वाढू लागली आहे. किरकोळ कांदा ८० रुपये तर लसूण ५०० दराने विकला जात आहे. निवडणुकीच्या काळात भाव वाढ सुरूच असल्याने, नागरिकांच्या नाराजीच्या रोषामुळे सर्वपक्षीय उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे.
लसूण मानवी आहारातील महत्त्वाचा घटक असून, या घटकामुळे जेवणाची लज्जत वाढते. परंतु या घटकाचे भाव वाढल्याने सर्व सामान्यांच्या जीवनातील लज्जत कमी झाली आहे, तर अनेक स्वयंपाक भरपूर लसूण गायब झाल्याची चित्र दिसत आहे. यंदा लसणाची बाजारात आवक कमी झाल्याने मागील महिन्यात अवघ्या शंभर रुपये प्रति किलो दराने विकल्या गेलेल्या लसणाला या महिन्यात ५०० रुपयांच्या घरात विकला गेला आहे. त्यामुळे लसूण खरेदी करताना ग्राहक हात अखडता घेत असल्याचे पहावयास मिळत आहे.
साधारणपणे सर्वसामान्य नागरिक उन्हाळ्यात कांद्याची साठवण करून ठेवतात. त्यामुळे दर वाढले तरी फारसा फरक पडत नाही. लसूण मात्र साठवून ठेवता येत नसल्याने त्याची खरेदी वेळेवरच मिळेल तेंव्हा करावी लागते. आगामी काळात लसणाचे दर वाढण्याची शक्यता व्यापारी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अनेकांच्या स्वयंपाक घरातून लसून गायब झाल्याचे सद्यातरी चित्र दिसत आहे.
परतीच्या पावसाचा फटका कांदा उत्पादनावर झाला असून कमी होऊ लागली आहे. अजून दोन आठवडे कांदा दर तेजीत राहतील असा अंदाज उद्यापर्यंत मी व्यक्त केला आहे. नवीन वर्षात पीक बाजारात येईपर्यंत लसणाची भाववाढ सुरूच राहण्याची शक्यता आहे.