शिरूर मध्ये ७५ संविधान दिन उत्साहात साजरा
निर्भय न्यूज लाईव्ह: प्रतिनिधी शिरूर

शिरूर मध्ये सिद्धार्थ नगर मित्र मंडळाच्या वतीने संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन
सिद्धार्थ नगर मधील, सिद्धार्थ चौकामध्ये संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचनाच्या कार्यक्रम प्रसंगी, सामाजिक कार्यकर्ते सतीश बागवे, संदीप शिंदे, शिवाजी पवार, किरण दिवटे, साहिल सोनवणे, ज्ञानेश्वर शेलार, पंडित ससाने, प्रकाश डंबाळे, राजाराम तराळ, बुवा जगताप, सोमनाथ सुतार, हेमंत लोखंडे, शिवा दिवेकर, गौतम गायकवाड, साखरे मॅडम, एडवोकेट करिष्मा बुलाखे, सीमा शिंदे, मोहिनी सुतार, कीर्ती दिवटे, आरती सोनवणे, बबई नाडे, आशाबाई पवार, फुलाबाई धोत्रे, सुनीता भापकर व सिद्धार्थ नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सर्व मान्यवर व उपस्थित नागरिकांच्या वतीने भारतीय संविधानाच्या उद्देशिकाचे सामूहिक वाचन करण्यात आले.
शिरूर शहराच्या माजी नगरसेविका मायाताई गायकवाड म्हणाल्या, की 2024-25 हे भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे यानिमित्त घराघरात संविधान पोहोचण्यासाठी कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजन संदीप शिंदे, किरण दिवटे, रोहन सोनवणे, शिवाजी पवार व मित्र परिवार यांनी केले उपस्थित यांचे स्वागत सतीश बागवे यांनी केले व आभार पंडित ससाने यांनी मानले.