राजकीय
Trending
महाराष्ट्रातील जनता महायुती सरकारवर खुश असल्याने काँग्रेस अस्वस्थ: केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू
निर्भय न्यूज लाईव्ह:पुणे

देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी महाराष्ट्राची निवडणूक महत्त्वाची.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय संसदीय कामकाज व अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजीजू म्हणाले, “काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारंवार अपमान केला, स्वतःच्या सोयीनुसार संविधानात बदल केला, राहुल गांधी संविधानाबाबत खोटा प्रचार करतात; ते कधीही प्रगल्भ नेते होऊ शकणार नाही.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने दलितांची दिशाभूल करून मतदान घेतले. समाजात जाऊन आम्ही चर्चा केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वात आधी भारतरत्न पुरस्कार देणे आवश्यक होते, पण त्यांनी तसं केले नाही.
मोदी सरकार देशात आल्यानंतर अनेक पुल, बोगदे, उड्डाणपूल, रस्ते बनले. लाडकी बहिण योजनेमुळे गरीब महिलांना आर्थिक आधार मिळाला. महाराष्ट्रातील जनता महायुती सरकारवर खुश असल्याने काँग्रेस अस्वस्थ.