हिमालयाच्या रक्षणाकरिता सह्याद्री धावला होता, शिव प्रभूंची आण घेऊन एकटा मराठा लढला होता.. पानिपत १४ जानेवारी १७६१ खास लेख
निर्भय न्यूज लाईव्ह:नेटवर्क

हिमालयाच्या रक्षणाकरिता सह्याद्री धावला होता, शिव प्रभूंची आण घेऊन एकटा मराठा लढला होता.. पानिपत १४ जानेवारी १७६१ खास लेख …
सर्व फोटो सोशल मीडिया साभार..
निर्भय न्यूज नेटवर्क
संपादकीय
लाख बांगडी फुटली, दोन मोती गळाले, २७ मोहरा हरवल्या आणि चिल्लर खुर्द किती गेला याची गणना नाही……
हिंदुस्तान ची ओळख हिंदुस्थान म्हणून ठेवण्यासाठी पानिपतच्या तिसऱ्या युद्धात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या लाखो मावळ्यांना विनम्र अभिवादन…..
हिमालयाच्या रक्षणाकरिता सह्याद्री धावला होता, शिवप्रभुंची आन घेऊन एकटा मराठा लढला होता…
बचेंगे तो और भी लढेंगे म्हणत बिनशिराचा जळत होता..
सर्व फोटो सोशल मीडिया साभार..
समशेरीच चपराक बघत अब्दाली भ्याला होता…
सर्व फोटो सोशल मीडिया साभार…
हर एक मावळा उपाशीच झुंजत होता, यमुनेचा काट रक्ताचे पाट अन प्रेताचे खच बघून आजही असु दाटत होता..!!
पानिपत १४ जानेवारी १७६१
मराठ्यांचा कार्याचा घेतलेला छोटासा धांडोळा..
पानिपत तिसरी लढाई १४ जानेवारी १७६१ रोजी हिंदुस्थानातील हरियाणा राज्यातील पानिपत जवळ झाली. याच गावाजवळ पहिली दोन युद्ध झाले होती, ज्यात मुघलांची सरशी झाली व हिंदुस्थानात मुघल सत्तेचा पाया घातला गेला होता. तिसरी लढाई पानिपत येथे १४ जानेवारी १७६१ ला मराठे आणि अहमदशहा अब्दाली यांच्यात झालेल्या युद्धांन राजकीय स्तरावरील पुढील सगळी गणित बदलली. आज पानिपतचे युद्ध होऊन २६४ वर्ष पूर्ण झाली आहेत. या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला तरीसुद्धा ज्या शौर्याने मराठी या युद्धात लढले अहमदशहा अब्दालीला असा दणका दिला की, त्याची पुन्हा हिंदुस्तान कडे वाकडी नजर करून पाहण्याची हिम्मत झाली नाही.त्यामुळे मराठ्यांच्या या शौर्याचा संपूर्ण देशभर जयघोष झाला. श्रीमंत सदाशिवराव भाऊ पेशवे यांनी मराठ्यांची नेतृत्व केले होते. या लढाईसाठी पुण्यातून मराठे उत्तरेकडे रवाना झाले होते. श्रीमंत सदाशिवराव भाऊ पेशवे यांच्यासह श्रीमंत विश्वासराव पेशवे, समशेर बहादूर आणि अनेक मराठा सरदार होते.
सर्व फोटो सोशल मीडिया साभार…
पानिपत युद्धासंदर्भात अनेक पुस्तकातून,कादंबऱ्यातून, मालिका चित्रपटाच्या रूपातून माहिती उपलब्ध आहे. त्या काळातील पत्र लेखन द्वारे ही अनेक पुरावे इतिहासकारांनी मांडले आहेत. यातून त्या काळाची राजकीय परिस्थिती, परकीय शत्रूंचे आक्रमण याची प्रचिती येते. पानिपतची युद्ध आजही अनेकांच्या कुतूहलाचा विषय आहे. तेव्हा जाणून घेऊया पानिपत युद्धातील काही महत्त्वाच्या घडामोडी:
पार्श्वभूमी–
औरंगजेबच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याला मराठ्यांनी उतरती कळा लावून, आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली होती.१७५० दशकात मराठ्यांनी उत्तर भारतात बऱ्याच मोठ्या मोठ्या मोहिमा काढल्या. पार पाकिस्तानातील अटकेपर्यंत आपले साम्राज्य प्रस्थापित केले व ७ते८ शतके राज्य करणाऱ्या एक छत्री इस्लामी सत्तेला आव्हान दिले. थोरल्या बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दी पर्यंत उत्तर हिंदुस्तानात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. हिंदुस्तानच्या सीमा ओलांडून मराठी येऊ लागल्याने हिंदुस्तान बाहेरील परकीय (इस्लामी)सत्तांना मराठ्यांना अंकुश घालने गरजेचे वाटू लागले. त्यातच मराठ्यांनी इ.स १७५८ रोजी दिल्लीवर कब्जा मिळवला व मुघलांना नाममात्र राज्यकर्ते बनवले. याच वेळेस अहमदशहा अब्दाली चा मुलगा तिमुर शहा दुराणी ला हाकलून लावले. मुस्लिम धर्मगुरूंनी याला आपल्या धर्मावरचे मोठे संकट मानले व मराठ्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आघाडी उघडण्याची आव्हान केले. अफगाण सेनानी अहमदशाह अब्दाली यांनी याला होकार दिला. त्याने १७५९ मध्ये बलुच, पश्टून व अफगाणी लोकांची फौज उभारली व उत्तर हिंदुस्थानातील छोट्या छोट्या चौकावर हल्ले करण्यास सुरुवात केली व मराठ्यांशी उघड उघड वैर पत्करले. या संघर्षामध्येच मराठ्यांचा मुख्य सेनापती दत्ताजी शिंदे यांची नजीबने क्रूर हत्या केली. सहाजिकच मराठ्यांना उत्तर देणे गरजेचे होते. तसेच आक्रमणकर्त्या अहमद शहा अब्दलीला हुसकावणे गरजेचे होते. नाहीतर उत्तर हिंदुस्थानातील काही दशकात मिळवलेले वर्चस्व गमविण्याची भीती होती. म्हणून मराठ्यांनी पण १ लाखाहून मोठी फौज उभारली व पानिपतकडे आगे कुच केली.
१) अफगाणिस्तानचा बादशाह अहमदशाह अब्दाली आणि श्रीमंत सदाशिवराव भाऊ पेशवे यांच्या सैन्यात १४ जानेवारी १७६१ ला पाणीपतला युद्ध झाले.
२) सकाळी या युद्धाला सुरुवात झाल्यावर दुपारपर्यंत मराठ्यांचा विजय निश्चित होता, परंतु दुपारी दोनच्या सुमारास श्रीमंत विश्वासराव पेशवे हे धारातीर्थी पडले. त्यांच्या मदतीस श्रीमंत सदाशिवराव भाऊ पेशवे आले. दोघांच्या रिकाम्या अंबाऱ्या बघून मराठ्यांचा धीर खचला आणि त्यामुळे युद्धाचे चित्र पालटले. पाहता पाहता मराठ्यांचा दारुण पराभव झाला.
३) मराठे ही लढाई हरले तरीसुद्धा मराठ्यांनी ज्या जिद्दीन आणि शौर्याने अब्दालीचा प्रतिकार केला यातून धडा घेत पुन्हा अहमद शहा अब्दाली परत हिंदुस्थानात येण्याचे धाडस करू शकला नाही.
४)१७५९ मध्ये अहमद शहा अब्दाली न उत्तर हिंदुस्थानातील प्रांतावर हल्ला करायला सुरुवात केली. अहमदशहा अब्दालीची धुडगूस रोखण्यासाठी श्रीमंत सदाशिवराव भाऊ पेशवे यांच्या नेतृत्वाखाली मराठी सैन्य पुण्यातुन उत्तरेला निघाले. त्यांच्यासह होळकर, शिंदे, गायकवाड, बुंदेले आधी सरदार ही होते. नाना फडणीसही त्यांच्यासोबत होते. नानांनी या लढाईचे टीपणही करून ठेवले आहे. उत्तरेत गेल्यावर युद्धापूर्वी सर्वप्रथम सदाशिवराव भाऊ पेशवे यांनी दिल्लीचा किल्ला जिंकून घेतला.
५) दिल्ली सल्तनत आणि मराठे यांच्यात अहमदिया करार झाला होता. या करारा अंतर्गत दिल्लीचे रक्षण करायचे असे नमूद करण्यात आले होते. त्यानुसार मराठ्यांनी दिल्लीच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारली होती. याच करारात झालेल्या तरतुदीमुळे कर्तव्याची जाणीव ठेवून मराठ्यांनी अहमदशाह अब्दालीने जेव्हा दिल्लीवर हल्ला केला तेव्हा दिल्लीच्या रक्षणासाठी मराठ्यांच्या सैन्याने उत्तरेकडे कूच केली. एक लाखाहून अधिक सरदार व सैन्य सदाशिव भाऊ पेशवे यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या सैन्यात होते. मराठ्यांच्या सैन्यात इब्राहिम खान गारदी यांचेही सैन्य होते. ज्यांनी फ्रेंचांकडून तोफ गोळ्यांचे प्रशिक्षण घेतले होते.
६) उत्तरेकडील एका लढाईत नजीब उद्दौला यांने मराठा सरदार दत्ताजी शिंदे यांना ठार मारले होते. याचाही राग मराठ्यांच्या मनात जळत होता. दत्ताजी शिंदे आणि नजीब उद्दौला यांच्यातील युद्धभूमीवरील एक प्रसंग प्रचलित आहे. युद्धभूमीवर लढताना नजीब म्हणतो “क्यो पाटील, और लडोगे?”त्यावर जखमी अवस्थेत असूनही दत्ताजी शिंदे यांनी वाघासारखे एकच डरकाळी फोडली आणि म्हणाले,” बचेंगे तो और भी लढेंगे!”
७) पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला. युद्धापूर्वी सैन्यात अन्नधान्य संपले होते. सोबतच हत्ती, घोडे अनेक शिपाई ही मृत्युमुखी पडत होते. युद्धाच्या वेळीही मराठ्यांच्या त्रान उरला नव्हता. श्रीमंत सदाशिवराव भाऊ पेशवे, श्रीमंत विश्वासराव पेशवे, समशेर बहादुर हे या लढाईत मृत्युमुखी पडले. अशी एक आख्यायिका आहे की जेव्हा १८ वर्षाच्या विश्वासरावांचे प्रेत अहमद शहा अबदलीच्या सैन्यात आले तेव्हा त्यांचे प्रेत पाहून अफगाणी सैन्य सुद्धा हळहळले.
८) श्रीमंत नानासाहेब पेशवे यांना देखील मिळालेल्या पत्रात दोन मोती गळाले, सव्वा लाख बांगडी फुटली, २७ मोहरा हरवल्या आणि चिल्लर खुर्द किती गेला याची गणना नाही’असा उल्लेख आहे हे वाचून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.
फोटो सोशल मीडिया साभार…
•पानिपतच्या तिसऱ्या लढायची काही वैशिष्ट्ये•
•या लढाईत मराठ्यांचा विश्वासघात झाला होता.
•या लढाईत अफगान सैन्य मराठ्यांच्या तुलनेत खूप मोठे होते.
•या लढाईत मराठ्यांच्या सैन्याकडे काही उत्कृष्ट फ्रेंच बनावटीच्या तोफा होत्या.
•या लढाईत मराठ्यांचा तोफखाना स्थिर होता.
•या लढाईत अफगान सैन्याची गतीशीलता होती.
•अब्दालीने यमुना ओलांडतच दिल्लीतून येणारा रसद पुरवठा खंडित केला.
•सुरवातीला सुरजमल जाट मराठ्यांच्या बाजूने सामील झाला,पण लवकरच माघार घेतली आणि अब्दालील माधो सिंग यांची गुप्त मदत होती.
•नोव्हेंबर महिना सुरू झाला की, दक्खनच्या उष्ण तापमानाची सवय असलेल्या मराठ्यांना उत्तरेकडील हिवाळ्यात थंडी वाजू लागली.मराठे पातळ मलमल परिधान करत तर अफगाण लोक त्यांच्या सोबत जॅकेट होते, त्याच वेळी अफगानाणी मराठ्यांचा अन्नपुरवठा बंद केला.
•पानिपत मधील वारंवार चकमकीमुळे मराठा छावणी मृत प्राण्यांनी व मृतदेहानी वेढली या कारणामुळे मराठा छावणीत रोगराई पसरू लागली.
•अब्दालीने आपली छावणी आणखी हलवली कारण त्यांच्याकडे पैसा आणि संसाधने होती. त्यामुळे तो मृतदेहाच्या ढिगारेंपासून लांब होता.
•२ महिने निधी,पुरवठा, आणि अन्न नसल्यानंतर,दुर्बल पण शुर मराठ्यांनी प्रेताच्या तीव्र दुर्गंधीत उपाशी राहण्यापेक्षा लढत मरण्याचा निर्णय घेतला.