संपादकीय
Trending

शेतकरी समाजाच्या दुर्दशाने निराश झालेले व त्याच्यावर “स्वराज्य” हाच उपाय मानणारे भारताच्या स्वतंत्र चळवळीचे पहिले क्रांतिकारक व “सशस्त्र क्रांतीचे जनक”वासुदेव बळवंत फडके यांची आज पुण्यतिथी निमित्त खास लेख..!

निर्भय न्यूज लाईव्ह: वृत्तसेवा

ताज्या घडामोडी मोबाइल वर मिळवा.फोटो वर क्लिक करा

शेतकरी समाजाच्या दुर्दशाने निराश झालेले व त्याच्यावर “स्वराज्य” हाच उपाय मानणारे भारताच्या स्वतंत्र चळवळीचे पहिले क्रांतिकारक व “सशस्त्र क्रांतीचे जनक”वासुदेव बळवंत फडके यांची आज पुण्यतिथी निमित्त खास लेख..

भारताच्या स्वतंत्र चळवळीतील पहिले क्रांतिकारक व सशस्त्र क्रांतीचे जनक वासुदेव बळवंत फडके महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवर जन्मलेले हे व्यक्तिमत्व एका सामान्य कुटुंबातील होते. वासुदेव बळवंत फडके यांचे मूळ घराणे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी या गावातील आहे. वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा अनंतराव फडके कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते.हा किल्ला १८१८ रोजी इंग्रजाच्या स्वाधीन करण्याआधी त्यांनी दोन-तीन दिवस इंग्रजांच्या विरुद्ध लढा दिला. कर्नाळा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेल्यानंतर पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्यातील शिरढोण(रायगड)गावी फडके कुटुंब वास्तव्यास आले. अनंतराव फडके यांचे पुत्र बळवंतराव फडके यांना शिरढोण येथे पुत्ररत्न झाले तेच म्हणजे वासुदेव बळवंत फडके. लहानपणापासूनच वासुदेव बळवंत फडके यांना कुस्तीची खूपच आवड होती. अभ्यासात हुशार असल्यामुळे त्यांना शिक्षणासाठी पुण्यात पाठवण्यात आले. वासुदेव बळवंत फडके यांचे प्राथमिक शिक्षण शिरढोण(रायगड) येथे झाले. माध्यमिक शिक्षण हे पुणे, मुंबई, कल्याण या ठिकाणी झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते पुण्यातच लष्करी खाते विभागात लिपिक म्हणून रुजू झाले.

ब्रिटिश राजवटी दरम्यान शेतकरी समाजाच्या दुदर्शाने फडके हे व्यतित झाले होते. त्यांचा हा विश्वास होता की, “स्वराज्य” हाच याच्यावरील उपाय आहे. भारताला स्वराज्य मिळावे याकरिता परदेश दौरे करणारे ते पहिले भारतीय होते.१८७५ मध्ये ब्रिटिशांचा पाडाव करण्यासाठी कोळी भिल्ल,धनगर समाजाच्या मदतीने “रामोशी” नावाची क्रांतिकारक गटाची स्थापना केली.२० फेब्रुवारी १८७९ फडके यांनी आपले सहकारी विष्णू गद्रे, गोपाळ साठे, गणेश देवधर आणि गोपाळ हरी कर्वे यांच्यासह पुण्यापासून आठ मैलाच्या उत्तरेला असणाऱ्या लोणी गावा बाहेर २०० तरुणाचं बलवान सैन्य दलाची स्थापना केली. बहुदा ही भारताची पहिली क्रांतिकारक सेना होती. त्यांच्या सशस्त्र संघर्षासाठी निधी गोळा करण्यासाठी आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी फडके आणि त्यांच्या साथीदारांनी एका श्रीमंत इंग्रज व्यावसायिकावर छापा टाकला होता.

मे १८७९ मध्ये ब्रिटिश सरकारच्या शोषणात्मक आर्थिक धोरणाचा निषेध करीत वासुदेव बळवंत फडके यांनी आपलं घोषणापत्र जारी केले आणि ब्रिटिश सरकारला चेतावणी दिली. या घोषणेच्या प्रती राज्यपाल, जिल्हाधिकारी आणि अन्य सरकारी अधिकाऱ्यांना पाठविल्या गेल्या आणि देशभरात त्यामुळे एकच खळबळ उडाली. फडके यांनी ब्रिटिश सैनिकावर केलेल्या हल्ल्यानंतर काही दिवस संपूर्ण पुणे शहरात ताबा मिळवायला होता. या घटनेमुळे ब्रिटिशांना त्यांच्या ताकतीची जाण होऊन, वासुदेव बळवंत फडके म्हणजे नक्की कोण, हे त्यांना कळाले .१८६० मध्य फडके, लक्ष्मण नरहर इंदापूरकर, आणि वामन प्रभाकर भावे या तीन समाज सुधारक आणि क्रांतिकारकांनी पुना नेटिव्ह संस्था स्थापन केली, जी सध्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी म्हणून ओळखली जाते. 

इंग्रजांनी देशावर त्यांची पकड घट्ट केली तेव्हा वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्र सोडून बाहेर जावे लागले. वासुदेव बळवंत फडके आंध्र प्रदेशच्या कर्नुल जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग श्रीशैला मल्लिकार्जुन च्या मंदिरात गेले. इंग्रज सरकारचे कार्यालय असलेल्या पुण्यातील दोन पेशवे वाड्यांना फडके यांनी आग लावली तेव्हापासून इंग्रज सरकार वासुदेव बळवंत फडके वर छापा टाकत होते.१८७९ मध्ये वासुदेव बळवंत फडके यांना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांना येमेन मधील अडेन येथील तुरुंगात हलवण्यात आले कारण की इंग्रज सरकारला त्यांना अटक केल्यानंतर भारतीय लोकांमधून येणाऱ्या प्रतिक्रियांची भीती वाटत होती. फेब्रुवारी१८८३ रोजी त्यांनी तुरुंगाचे दरवाजे तोडून तुरुंगातून स्वतःची सुटका केली, पण त्यांना इंग्रजांकडून ताबडतोब अटक करण्यात आली. त्यानंतर इंग्रज सरकारला विरोध म्हणून त्यांनी आमरण उपोषण पत्करले आणि अखेर १७ फेब्रुवारी १८८३ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली ते अवघ्या ३८ वर्षाचे होते. महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवर जन्मलेल्या सशस्त्र क्रांतीचे जनक वासुदेव बळवंत फडके यांना विनम्र अभिवादन..!!

शेअर करा

मुख्य संपादक- श्री.अनिल डांगे

निर्भय न्यूज लाईव्ह, हे एकमेव निर्भीड न्यूज पोर्टल आहे. निर्भय न्यूज लाईव्ह हे सर्व क्षेत्रातील बातम्या, निर्भयपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहे.अर्थातच आपल्या सर्वांची साथ तितकीच महत्त्वाची आहे.!आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी आपण ८१४९२३२२३५ या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये