संपादकीय
Trending

देशात शिवरायांचे स्वराज्य पुन्हा यावे, हा देश स्वतंत्र व्हावा व रयत स्वाभिमानाने जगावी यासाठी सशस्त्र क्रांती उभारणारे आणि देशप्रेमी तरुण घडवणारे आद्य क्रांतिगुरू क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे.यांच्या पुण्यतिथी निमित्त खास लेख…

निर्भय न्यूज लाईव्ह: वृत्तसेवा

ताज्या घडामोडी मोबाइल वर मिळवा.फोटो वर क्लिक करा

 

१७ फेब्रुवारी हा क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचा पुण्यतिथी निमित्त खास लेख…

जगेन तर, देशासाठी.! मरेन तर, देशासाठी..!! लहुजी वस्ताद साळवे.

     पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी एक छोटेसे गाव त्याचे नाव पेठ या गावी “लहुजी वस्ताद साळवे” यांचा पराक्रमी कुटुंबात जन्म झाला. स्वतः “छत्रपती शिवाजी महाराजांनी” त्यांच्या पूर्वजांना युद्धात केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे “राऊत”ही पदवी देऊन सन्मानित केलेले होते. साळवे घराण्याचे शौर्य आणि पराक्रमाची परंपरा लहुजींचे वडील राघोजी साळवे यांच्याकडे वारस हक्काने चालून आलेली होती, असे म्हणतात राघोजी दादा यांनी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळात पुरंदर भागात जिवंत वाघ पकडला होता, या पराक्रमाची बातमी पेशव्यांना समजली, साळवे घराण्याचा इतिहास पेशव्यांना समजला त्यांनीही सन्मानपूर्वक राघोजी साळवे यांची शिकार खाना व शस्त्रगार प्रमुख म्हणून नेमणूक केली. 

    १८१७ मध्ये लढल्या गेलेल्या “मराठा • इंग्रज” लढ्यात राघोजी दादा साळवे आणि २३ वर्षाचे लहुजी वस्ताद साळवे बापलेक मावळ्या सोबत सामील झाले. या लढाईत आपल्या तलवारीच्या जोरावर इंग्रज सैन्यांना रोखून धरले. या बाप लेकाचा पराक्रम पाहून इंग्रज अधिकारी सुद्धा आश्चर्य चकित झाले. लहुजी राघोजी साळवे यांच्या वडिलांना युद्धभूमीवर वीरमरण आले. पुण्यातील मांगिरबाबा ची समाधी हे त्यांचे स्मृतिस्थळ म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी लहुजींनी शपथ घेतली की शनिवार वाड्यावर भगवा झेंडा उभारेल! असे हे शूर लहुजी वस्ताद..

    १८१८ दुसऱ्या बाजीरावांच्या पराभवाने मराठा सत्तेचा अस्त झाला. शनिवार वाड्यावर इंग्रजांचा युनियन जॅक फडकला. लहुजी ने आपल्या राघोजी दादांची समाधी ज्या ठिकाणी त्याने देह ठेवला तिथेच उभारली आणि शपथ घेतली की,” जगेन तर,देशासाठी..!! मरेण तर देशासाठी..!!

    इंग्रजी सत्ता उलथवून स्वराज्य निर्मिती करण्यासाठी लहुजी वस्ताद साळवे यांनी आयुष्यभर ब्रह्मचर्य स्वीकारलं, स्वतःचं संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांनी देशसेवा हाच प्रपंच मानला.

    भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात लहुजी वस्ताद साळवे यांचे फार मोठे योगदान आहे. लहुजी वस्ताद साळवे यांना माहीत होतं. जगावर राज्य करणाऱ्या इंग्रजांवर मात करणं एवढं सोपं नव्हतं! त्यासाठी जहाल क्रांतिकारकांची एक पिढी तयार करावी लागेल. ते उत्तम लढवय्ये शिक्षक होते. तलवारबाजी, दांडपट्टा, कुस्ती, निशानबाजी प्रशिक्षण ते युवकांना पुण्यातील गंज पेठ,या तालमीत देत. वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, ज्योतिबा फुले, सदाशिव परांजपे, मोरो विठ्ठल वाळवेकर, पोवळे अशा दिगजासह अनेक देशभक्तांनी लहुजींच्या आखाड्यात प्रशिक्षण घेतले.

     महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शिक्षण प्रसाराच्या चळवळीच्या पाठीमागे ते ठामपने उभे होते. समाज बांधवांना शिका,धीट व्हा व शोषण कर्त्यांना धडा शिकवा.! असा उद्देश ते नेहमी करत. महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या मुलींच्या शाळेमध्ये पहिली विद्यार्थिनी लहुजी वस्ताद साळवे यांची नातलग मुक्ता साळवे.

     क्रांतिवीर उमाजी राजे नाईक यांना १९३१ साली इंग्रजा विरुद्ध बंड करण्यासाठी लहुजी वस्ताद यांनी सहकार्य केले. वासुदेव बळवंत फडके यांच्या सशस्त्र उठावात देखील त्यांनी सहाय्य केले. वासुदेव बळवंत फडके हे त्यांचे पट शिष्य होते.१८१८ ते १८८१ या प्रदीर्घ कालावधीमध्ये ब्रिटिशांच्या विरोधात सशस्त्र कार्यकर्ते तयार करण्याचे फार मोलाचे काम लहुजी वस्ताद साळवे यांनी केले म्हणून त्यांना “आद्य क्रांतिगुरू” या उपाधीनेही गौरविले जाते.

     १७ फेब्रुवारी १८८१ रोजी संगमवाडी परिसरात झोपडी वजा घरामध्ये लहुजींची प्राणज्योत मालवली आणि महान क्रांती पर्वाचा शेवट झाला, पण लहुजी वस्ताद यांनी लावलेली क्रांतीची ज्योत त्यांच्या शिष्यांनी विझु दिली नाही. पुढील अनेक पिढ्यांनी हा दिवा तेवतच ठेवला. अशा या महान क्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन… 🙏💐💐

शेअर करा

मुख्य संपादक- श्री.अनिल डांगे

निर्भय न्यूज लाईव्ह, हे एकमेव निर्भीड न्यूज पोर्टल आहे. निर्भय न्यूज लाईव्ह हे सर्व क्षेत्रातील बातम्या, निर्भयपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहे.अर्थातच आपल्या सर्वांची साथ तितकीच महत्त्वाची आहे.!आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी आपण ८१४९२३२२३५ या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये