शिरूर येथे तलवारी आणि लोखंडी रॉडने मारहाण, नऊ जणांवर गुन्हा दाखल
निर्भय न्यूज लाईव्ह:वृत्तसेवा

शिरूर येथे तलवारी आणि लोखंडी रॉडने मारहाण, नऊ जणांवर गुन्हा दाखल
शिरूर (पुणे): शिरूर पोलीस स्टेशनमध्ये काल (12 एप्रिल) दुपारी झालेल्या मारहाणीच्या प्रकरणी नऊ जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फिर्यादी अबूजैद अयाज कुरेशी (वय २५, रा. रामलिंग कॉम्प्लेक्स पाबळ फाटा, शिरूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी मीराबक्ष कुरेशी, मस्ताक कुरेशी, जुबेर कुरेशी, इम्तियाज कुरेशी, सिराज कुरेशी, तनवीर कुरेशी, आमान कुरेशी, आयमान कुरेशी आणि शब्बीर कुरेशी (सर्व रा. शिरूर) यांनी बेकायदेशीर जमाव जमवून त्यांना आणि त्यांच्या वडिलांना मारहाण केली.
ही घटना शिरूर बायपास रोडवरील ताज मटन शॉप या दुकानासमोर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी कुरेशी यांनी सांगितले की, आरोपींनी हातात लोखंडी रॉड, चतुर आणि तलवार घेऊन येत त्यांना व त्यांचे वडील आयाज यांना मारहाण करून जखमी केले. तसेच, त्यांचे दिघे वडील आणि भाऊजी शान यांनाही लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
शिरूर पोलिसांनी या प्रकरणी भा.दं.वि. कलम 189(1)(2), 189(4), 190, 118 (1), 115(2), 352, 351(1)(2) आणि आर्म ॲक्ट 4.25 नुसार गुन्हा क्रमांक 246/2025 दाखल केला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक (PSI) शुभम चव्हाण हे करत आहेत. दाखल पोलीस अधिकारी म्हणून PSI झेडगे मॅडम यांनी कामकाज पाहिले असून, पोलीस निरीक्षक केंजळे हे प्रभारी अधिकारी आहेत.
या घटनेमुळे शिरूर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. मारहाणीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.