ताज्या घडामोडी
Trending
जनता दलाची महायुतीकडे अधिक जागांची मागणी; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे प्रस्ताव सादर
स्थानिक निवडणुकांमध्ये प्रतिनिधित्व द्या! जनता दलाने भाजपसमोर मांडली आपली भूमिका

जनता दलाची महायुतीकडे अधिक जागांची मागणी ..!
मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जनता दल सेक्युलरने महायुतीकडे अधिक जागांची मागणी केली आहे. जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी पक्षाच्या शिष्टमंडळासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन ही मागणी केली. या बैठकीत केवळ निवडणुकाच नाही तर महामंडळांवरील नियुक्त्यांमध्येही जनता दलाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे अशी मागणी करण्यात आली.
महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून आम्हाला योग्य सन्मान मिळायला हवा, असे शेवाळे यांनी बैठकीत सांगितले. या भेटीत नाथाभाऊ शेवाळे यांनी या मागणीचा एक ठरावही रवींद्र चव्हाण यांच्याकडे सादर केला आहे. त्यामुळे आगामी काळात महायुतीत जागावाटपावरून चर्चा वाढण्याची शक्यता आहे. या बैठकीला जनता दलाचे कार्याध्यक्ष सलीम भाटी यांच्यासह इतर पदाधिकारीही उपस्थित होते.