२५ जानेवारी पासून मराठ्यांच्या न्याय हक्क मागण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचेअंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू..
निर्भय न्यूज लाईव्ह: वृत्तसेवा

२५ जानेवारी पासून मराठ्यांच्या न्याय हक्क मागण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे सहकाऱ्यांसह सामूहिक आमरण उपोषण सुरू.
मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी आरक्षण घेण्यासाठी आम्ही आता माघार घेणार नाही , असे आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलन करते मनोज जरांगे यांनी सांगितले.
जरांगे म्हणाले की, या अंतरवाली सराटी या ठिकाणी दीड वर्षापासून आरक्षण लढा सुरू आहे.जानेवारी ला ‘सगे सोयरे’चा अध्यादेश काढून एक वर्ष होत आहे. तरीही मागणी पूर्ण झाली नाही. आता परत उपोषण सुरू आहे. शासनाने सरसकट कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करावे, सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी राज्यात आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे परत घ्यावे, तसेच सातारा, हैदराबाद,बॉम्बे चे गॅझेट लागू करावे, शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी आधी मागण्यासाठी उपोषण सुरू केले आहे. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख, परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी च्या हत्येतील आरोपींना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी जरांगे यांनी केली. दरम्यान, या ठिकाणी जे आंदोलन उपोषण सुरू आहे याबाबत शासनाकडून अद्याप कोणताही संपर्क झालेला नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आरक्षणाकरिता मदत झाली. आता फडणवीस मुख्यमंत्री आहेत. यांचे बहुमत आहे, सत्ता आहे. आता त्यांनी आरक्षण दिले पाहिजे, ते आरक्षण देतील अशी अपेक्षा आहे.
प्रमुख मागण्या
-सगेसोयरेची अंमलबजावणी करावी
– मराठा आंदोलकांवर दाखल केलेले सर्व गुन्हे मागे घ्यावेत
– हैद्राबाद, सातारा, बॉम्बे गव्हर्नमेंट, औंध संस्थानचे गॅझेटिअर्स लागू करावे
– आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या मराठा बांधवांच्या कुटुंबियांना दिली जाणारी आर्थिक मदत सरकारने बंद केली आहे. ती सुरु करावी व कुटुंबातील एका सदस्याला प्रशासकीय सेवेत रुजू करून घ्यावे
– स्व.संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निष्पक्षपातीपणे तपास करून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा करण्यात यावी.
– तसेच स्व. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस जबाबदार आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी.
आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी मराठा सेवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेकडो उपोषणकर्ते व मराठासेवक आंतरवाली सराटी येथे दाखल झाले असून आंदोलन ठिकाण भरून गेले आहे. तसेच हजारो मराठासेवक महाराष्ट्रभरातून दाखल होणार आहेत.
“सत्ता व बहुमत असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता तरी आरक्षण द्यावे. फडणवीस यांच्या मनातले खरे काय आहे, आता राज्याला कळणार आहे. आरक्षण घेण्यासाठी आम्ही ठाम असून आता माघार घेणार नाही’..!
संघर्ष योद्धा- मनोज दादा जरांगे पाटील
एक मराठा.. लाख मराठा!