ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रमांनी शिरूर नगरपालिका शाळा क्र. 1 गाजली
निर्भय न्यूज लाईव्ह:वृत्त सेवा

ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रमांनी शिरूर नगरपालिका शाळा क्र. 1 गाजली
शिरूर : शिरूर नगरपालिका शाळा क्र. 1 येथे आज सकाळी ७.४५ वाजता मुख्याधिकारी श्री. प्रीतम पाटील साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या स्फूर्तिदायक समूह गीताने झाली. यानंतर संविधानावर आधारित पथनाट्याद्वारे विद्यार्थ्यांनी सामाजिक संदेश दिला. यासोबतच संगीतमय लेझीम व सांस्कृतिक नृत्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
मुख्याधिकारी श्री. प्रीतम पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाचे कौतुक केले आणि त्यांना प्रोत्साहन दिले. शाळेचे मुख्याध्यापक उषा वेताळ,संपदा राठोड,प्रतिभा आहेर,राजू लांघी, सचिन जाधव व सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला पालक आणि नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.