रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये लिफ्ट देण्याच्या बहाण्याने जबरी चोरी करणाऱ्या दोन चोरांच्या रांजणगाव पोलिसांनी आवळल्या मुसक्या.
निर्भय न्यूज लाईव्ह:रांजणगाव प्रतिनिधी

रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये लिफ्ट देण्याच्या बहाण्याने जबरी चोरी करणाऱ्या दोन चोरांच्या रांजणगाव पोलिसांनी आवळल्या मुसक्या..
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बहुतांश कंपन्यांमध्ये तीन शिफ्ट मध्ये काम चालत असल्याने रात्रीच्या वेळी देखील कामगारांचे ये जा चालू असते. त्याचाच फायदा घेऊन दिनांक १८/०१/२५ रोजी रात्री ११:०० वा.चे सुमारास एका कंपनीतील कामगार कंपनीतून सुटल्यावर पायी चालत घरी विल्स इंडिया च्या पाठीमागे,पाचंगे वस्ती, ढोक सांगवी कडे जात असताना, एका हिरो होंडा मोटरसायकल वरून दोन अनोळखी व्यक्तीने येऊन पायी जाणाऱ्या कामगारास कोठे राहतो वगैरे विचार पुस करत लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अंधारामध्ये नेऊन त्यास हाताने मारहाण करून त्याचा मोबाईल घेऊन त्यावरून फोन पे द्वारे १००० रू घेतले व फिर्यादी यांच्या कानातील एअर बड्स जबरदस्तीने काढून घेऊन निघून गेले होते. सदर प्रकरणी कामगारांच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी तपास पथकास सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणे बाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तपास पथकाने गोपनीय माहिती च्या व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर पुण्यातील दोन्ही आरोपींचे नाव, पत्ता निष्पन्न करत आरोपी नामे १) आकाश निळकंठ हनवते वय २२, वर्ष, मूळ राहणार देवठाणा, तालुका – पूर्णा जिल्हा- परभणी,२) नवनाथ भाऊराव कोल्हे वय २८ वर्ष, मूळ राहणार तारला,जिल्हा – जालना. यांना ताब्यात घेऊन २०/०१/२५ रोजी यांना अटक करण्यात आलेली आहे.
रक्कम व एअर बड्ड्स असा १९०० रुपये मुद्देमाल व तसेच ४०,००० हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक एम एच २२ बि. डी २४०८ असा एकूण ४१९०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी कामगिरी मा. पंकज देशमुख, सो. पो. अधीक्षक, पुणे ग्रामीण. मा. रमेश चोपडे,सो. अप्पर पोलीस अधीक्षक पुणे. प्रशांत ढोले सो, उपविभागीय, पोलीस अधिकारी शिरूर, विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, पोलीस कॉन्स्टेबल योगेश गुंड, पोलीस हवालदार तेजस रासकर, पोलीस हवालदार विलास आंबेकर, पोलीस हवालदार संतोष औटी, पोलीस हवालदार रामेश्वर आव्हाड,यांनी केली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवालदार तेजस रासकर हे करीत आहे.