भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते श्याम बेनेगल यांचे निधन
निर्भय लाईव्ह:वृत सेवा

भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते श्याम बेनेगल यांचे निधन
मुंबई, दि.२३ भारतीय चित्रपट सृष्टीतील समांतर चित्रपटाचे जनक दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माता श्याम बेनेगल यांचे सोमवारी मुंबईत निधन झाले. वयाच्या ९१ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्याम बेनेगल समांतर चित्रपटाचे जनक होते. अंकूर, मंथन, भूमिका, निशान, जुबेदा आणि सरदारी बेगम यासारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते.
बेनेगल यांच्या चित्रपटांनी भारतीय चित्रपट सृष्टीला उत्तम अभिनेते दिले. श्याम बेनेगल यांनी आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक वास्तव मांडले आणि प्रेक्षकावर दीर्घकालीन प्रभाव टाकला. पंडित जवाहरलाल नेहरू आणि सत्यजित रे यांच्यावर माहितीपट बनविण्याबरोबरच त्यांनी दूरदर्शनसाठी यात्रा कथा सागर आणि भारत एक खोज या मालिकांचे दिग्दर्शनही केले. या मालिका अद्यापही रसिकांच्या लक्षात आहेत. त्यांनी हिंदी बरोबर बंगाली चित्रपट हे दिग्दर्शित केले.
श्याम बेनेगल यांनी १४ डिसेंबर रोजी आपला ९० वा वाढदिवस आपल्या कुटुंबीय सोबत साजरा केला. बेनेगल यांचे योगदान भारतीय चित्रपट सृष्टीसाठी अनमोल होते. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपट सृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्व स्तरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.