भ्रष्टाचार घोडेबाजार आणि फोडाफोडीच्या, घाणेरड्या राजकारणातून सरकार बनविले गेले:आप खासदार संजय सिंह
निर्भय न्यूज लाईव्ह:मुंबई

भ्रष्टाचार घोडेबाजार आणि फोडाफोडीच्या, घाणेरड्या राजकारणातून सरकार बनविले गेले:आप खासदार संजय सिंह
महायुती सरकार हे घटनाबाह्य असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीला पाठिंबा देत असल्याचे त्यांनी येथील पत्रकार परिषदेत आज सांगितले. महाराष्ट्रातून दोन लाख कोटी रुपये अधिक मूल्यांचे प्रकल्प गुजरातमध्ये नेण्यात आल्याची टीका आम आदमी पक्षाचे खासदार संजय यांनी भाजपवर आज येथे केली.
खासदार संजय सिंह म्हणाले की, आमचा पक्ष राज्यात निवडणूक लढवत नाही, परंतु भाजपाचा पराभव करण्यासाठी पक्षाचा प्रत्येक स्वयंसेवक महाविकास आघाडीच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे. ‘ना बटिये, नाकात ये मिलकर भाजप को रपटीये’असे म्हणत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. दहा वर्ष पंतप्रधानपदी राहूनही पंतप्रधान म्हणत असतील की आम्ही सुरक्षित नाही, तर एवढी वर्ष पंतप्रधान काय करत होते? असा सवाल त्यांनी केला.
महाराष्ट्रातील भाजप-एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या महाराष्ट्र सरकारचे अकार्यक्षमता आणि चालवलेल्या भ्रष्टाचाराचा त्यांनी निषेध केला. राज्य सरकार हे घटना बाह्य आहे. भ्रष्टाचार, घोडेबाजार आणि फोडाफोडीच्या घाणेरड्या राजकारणातून सरकार गुणिले गेले आहे, त्यामुळे आमचा या सरकारला विरोध असल्याचे त्यांनी सांगितले.