आमदार अशोक पवार यांचा मुलगा ऋषिकेश अशोक पवार यांचे अपहरण करून मारहाण करत दहा कोटीची खंडणी मागितली
निर्भय न्यूज लाईव्ह

हे राजकीय षडयंत्र असल्याचे घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ऋषिकेश अशोक पवार यांनी सांगितले.
शिरूर-हवेली मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अशोक रावसाहेब पवार यांचे चिरंजीव ऋषीराज अशोक पवार (वय ३० वर्ष) यांना जबरदस्तीने कपडे काढण्यास सांगून व त्या ठिकाणी एका स्त्रीला आणून त्या स्त्रीला आशेपार्ह हालचाली करण्यास सांगून,त्यांचे अश्लील व्हिडिओ फोटो काढण्यात आले ते व्हायरल करण्याची धमकी देत दहा कोटीची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
या प्रकरणी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व आमदार अशोक रावसाहेब पवार यांचे चिरंजीव यांनी शिरूर पोलीस स्टेशन या ठिकाणी चार आरोपी आणि अज्ञात महिला यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
ऋषिराज पवार म्हणाले पत्रकार परिषद मध्ये बोलतांना सांगितले त्या गटातून या गटात आलेले कार्यकर्ते भाऊ कोळपे यांनी मला सांगितले की;काही कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशासाठी व एका महत्त्वाची बैठकीसाठी मांडवगण फराटा या ठिकाणी आपणास यावे लागेल.
मी माझ्या प्रचार दौऱ्यात असताना त्यांनी मला कार्यकर्ता पक्षप्रवेशासाठी व महत्त्वाच्या बैठकीसाठी घेऊन गेले व त्यांनी मला एका बंगल्यात नेऊन डांबून ठेवत, माझे हातपाय बांधून विवस्त्र करून; त्या ठिकाणी एका महिलेस आणून आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो त्यांनी काढून घेतले. त्यातील तीन आरोपी म्हणाले की, तुमच्या विरोधातील लोकांच्या संपर्कात आम्ही असून तुझे अश्लील व्हिडिओ व्हायरल करून पैसे मिळवू,आम्हाला दहा कोटी रुपये दे.! तरच आम्ही हे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करणार नाही, अशी धमकी दिली.! मी त्यांना म्हणालो की, माझ्याकडे आता पैसे नाही, मी त्याबाबत व्यवस्था करतो, असे त्यांना सांगितले असे -गोड बोलून त्यांचा विश्वास संपादन करत त्यांच्याच गाडीवर बसून, माझ्या मित्राला मोबाईल द्वारे मेसेज करून बोलावून घेतले व त्यातील एका आरोपीस पकडून त्याच्याकडील मोबाईल खेचून घेत त्यातील फोटो आणि व्हिडिओ स्वतःकडे घेत डिलीट केले या घटनेमुळे मी व माझे कुटुंबीय मानसिक दबावात असून पोलीस प्रशासन व निवडणूक आयोगाने याची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी व या घटनेचा सखोल तपास करावा.
याबाबत अशोक पवार म्हणाले की, राजकारण किती खालच्या स्तरावर गेले आहे. यातून हे दिसून येते. मुलाचे अपहरण करणे त्यास दाबून ठेवणे, कपड्याने गळा आवळणे, सुरा लावणे, धमकावणे, विवस्त्र करणे, या गोष्टी खूपच घृणास्पद आहे. पोलिसांनी याबाबत सूत्रधारचा शोध घ्यावा, या घटनेचा मी निषेध व्यक्त करत आहे.