अखेर शिरूर – हवेलीचा गड माऊली आबा कटके यांनी राखला..
निर्भय न्यूज लाईव्ह:शिरूर प्रतिनिधी
अजित दादांचा शब्द अखेर खरा ठरला..
लोकसभा निवडणुकीपूर्वी शिरूर – हवेलीतील प्रचारादरम्यान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी विद्यमान शरद पवार गटाचे आमदार विरोधी केलेले वक्तव्य निवडूनच कसा येतो..! मी बघतोच ..! अखेर खरे ठरले .
उत्तम नियोजन, उत्तम टाइमिंग,कार्यकर्त्यांकडून करेक्ट कार्यक्रम…
१९८ शिरूर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अशोक पवार यांचा ७४,५५० मतांनी पराभव करून शिरूर – हवेली च्या गडावर उत्तम नियोजन, सर्व ग्राउंड लेव्हलच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेत, महायुतीच्या सर्व घटक पक्षांना बरोबर घेऊन उत्तम टाइमिंग साधत नाव कोरले. अखेर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा शब्द खरा ठरवला.
उमेदवारांकडून मतदारांच्या यशस्वी यात्रा,महायुतीच्या लोकप्रिय योजनांचा फायदा
विजयानंतर शिरूर शहर पंचक्रोशी वाघोली या गावांमध्ये व निवडणूक मतमोजणीच्या केंद्राबाहेर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष, गुलालाची उधळण, घोषणांचा दणदणाट, फटाक्याची आतषबाजी करत विजय उत्सव साजरा केला.
माऊली आबांची सर्वसामान्य नागरिका बरोबर जुळलेली नाळ, उज्जैन महाकाल यात्रा, गुलबर्गा यात्रा, महायुतीच्या घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी झोकुन देऊन केलेले काम, महायुती ची लोकप्रिय लाडकी बहिणी योजना, ऊस पट्ट्यातील क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांचा संतापाचा फायदा, यशवंत सहकारी साखर कारखान्याचा मुद्दा, व्यंकटेश्वर शुगर मिलवर झालेले आरोप या सर्व मुद्दे माऊली आबा कटके यांचा विजय सुकर करण्यात मोलाचा ठरले.
महाविकास आघाडीच्या छोट्या घटक पक्षांना कमी दिलेले महत्त्व आणि स्थानिक मुद्द्यामुळे दुखावलेला मतदार त्यामुळे मतदानाचा टक्का घसरला…
आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता अशोक बापू यांच्या प्रचारामध्ये कोठेही दिसला नाही.
शिरूर -हवेली तालुक्यातील आमदार अशोक पवार यांना त्यांचे कट्टर समर्थक असणारे कार्यकर्ते टिकवताच आले नाही. खाबुगिरी व चमचेगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांचा गराडा नेहमीच त्यांच्या अवतीभवती पहावयास मिळाला. आमदार अशोक पवार यांचे शिरूर शहर व पंचक्रोशी मधील विकास कामाला कमी महत्त्व देणे, टपरी पुनर्वसन, झोपडपट्टी पुनर्वसन, रांजणगाव एमआयडीसी मध्ये स्थानिकांची होणारे हाल, दुरावलेले, दुखावलेले जवळचे राजकीय नेते,राजकीय नेत्यांचा मोठा विरोध व जवळचे असणारे अनेक नेते विरोधात गेल्याने व बंद असणारा घोडगंगा सहकारी साखर कारखाना प्रामुख्याने हे मुद्दे त्यांना मतदान कमी होण्यास,पराभूत कारणीभूत ठरले.
मतदानाच्या दिवशी काय केलं.?
निवडणुकीच्या मतदानाचा दिवस प्रत्येक पक्षासाठी महत्त्वाचा असतो. ज्या दिवशी जो पक्ष आपल्या मतदारांना जास्तीत जास्त संख्येने मतदान केंद्रापर्यंत घेऊन येतो त्याच्या विजयाची शक्यता अधिक असते. महायुती घटक पक्षाचे कार्यकर्ते महाविकास आघाडी च्या कार्यकर्त्यापेक्षा अधिक सक्रिय असल्याचे दिसून आले. आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष ग्राउंड वरील काम याची सांगड घालत प्रत्येक बूथ चे नियोजन केले. आपापल्या कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त मतदान होईल यासाठी महायुती घटक पक्षातील कार्यकर्त्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त मतदान कसे होईल यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. घरोघरी जाऊन मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी मदत केली. स्वर्गीय आमदार बाबुराव पाचरणे यांच्या कार्यकर्त्यांनी, माऊली आबा कटके यांचा घरोघरी जाऊन केलेला प्रचार, विशेषत: भाजपाला पारंपारिक पद्धतीने मतदान करणाऱ्या मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केल.
माऊली आबा कटके यांच्या विजयात भाजपच पारंपारिक मतदारांची साथ…
संघ स्वयंसेवकाच्या प्रयत्नामुळे भाजपाच्या पारंपरिक मतदारांच्या मतदानात सुमारे दहा टक्के पर्यंत वाढ झाली अशी माहिती संघाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी दिली. या वाढलेल्या मतामुळे माऊली आबा कटके यांना मोठा विजय मिळाला.
आज सकाळी ८:०० वाजता रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये या मतमोजणी सुरुवात झाली.२४ टेबलावर वीस फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी सुरू झाली पहिल्या फेरीपासून ते शेवटच्या २० फेरीपर्यंत माऊली कटके यांनी प्रत्येक फेरीत आघाडी घेतली ती शेवटपर्यंत त्यांनी कायम ठेवली. एकही अशी फेरी नाही की त्यामध्ये आमदार अशोक पवार यांना आघाडीत भेटली नाही त्यामुळे माऊली आबा कटके यांचा विजय सुसह्य झाला आणि एकतर्फी झाला.
शिरूर तालुक्यातून अशोक पवार व माऊली आबा कटके या दोघांमध्ये माऊली आबा कटके यांनी ३०,००० जास्त मतांची आघाडी घेतली हीच आघाडी अशोक पवार यांना पराभव करणारी ठरली.
एकूण पोस्टल मतदानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अशोक पवार यांना ६८० मते तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे माऊली आबा कटके यांना ६३९ मते पडली यामध्ये मात्र अशोक पवार यांनी आघाडी घेतलेली दिसली.
तर या निवडणुकीमध्ये पोस्टल मतदानामध्ये झालेल्या मतदानात सरकारी कर्मचारी यांनीही ९ नोटा करून यापैकी कोणताही उमेदवार पसंत नसल्याची नोटाकडे आपले मत दिले.
शिरूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार माऊली आबा कटके यांना १लाख ९२ हजार २८१ एवढी मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी शरद पवार गटाचे उमेदवार अशोक पवार यांना १ लाख १७ हजार ३१ एवढी मते मिळाली. त्यामुळे माऊली आबा कटके यांनी अशोक पवार यांचा पराभव करत विजयश्री खेचून आणला.
[या विजयाबद्दल बोलताना नवनिर्वाचित राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके म्हणाले की ,माझा विजय सर्वसामान्य माय माऊली ,मतदार राजा व लाडक्या बहिणीचा आहे. हा विजय माजी आमदार स्वर्गीय बाबुराव पाचरणे यांना समर्पित करतो.]
शिरूर, रांजणगाव, शिक्रापूर पोलिसांच्या वतीने कायदा सुव्यवस्था शांतता राखण्यासाठी या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.