शिरूर, २ ऑगस्ट: पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात एका महिलेवर चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जेवण आणि पैशांच्या मागणीवरून झालेल्या वादातून एका तरुणाने महिलेच्या छाती आणि हातावर चाकूने वार केले. या हल्ल्यात महिला जखमी झाली असून आरोपीने ‘आज तुला मारूनच टाकतो,’ अशी धमकीही दिल्याचे समोर आले आहे.
घटनेची सविस्तर माहिती
मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना शुक्रवार, २ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ७:४५ वाजण्याच्या सुमारास शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथे घडली. पीडित महिला वनिता अशोक सनन्से (वय २६) ही तिच्या बहिणीच्या घरासमोर बाहेर बसलेली होती. त्याचवेळी, तिचा मित्र राहुल तुकाराम माळी हा दारूच्या नशेत तिच्याकडे आला.
राहुलने वनिताकडे जेवण किंवा गावाकडे जाण्यासाठी पैसे मागितले. ‘मी स्वतः बहिणीच्या घरी राहते आणि माझ्याकडे पैसे नाहीत,’ असे वनिताने त्याला सांगितले. यावर संतापलेल्या राहुलने रागाच्या भरात तिच्या छातीवर आणि हातावर चाकूने वार केले. या हल्ल्यात वनिता गंभीर जखमी झाली असून, आरोपीने तिला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिली.
या घटनेनंतर वनिताने शिरूर पोलीस ठाण्यात राहुल तुकाराम माळी याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. शिरूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५७४/२०२५ अंतर्गत भारतीय दंड विधान कलम ११8(१), ३५२, ३५१(२)(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार कळमकर करत आहेत.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत.
निर्भय न्यूज लाईव्ह, हे एकमेव निर्भीड न्यूज पोर्टल आहे. निर्भय न्यूज लाईव्ह हे सर्व क्षेत्रातील बातम्या, निर्भयपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहे.अर्थातच आपल्या सर्वांची साथ तितकीच महत्त्वाची आहे.!आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी आपण ८१४९२३२२३५ या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.