सन्मान कर्तव्याचा
Trending

शिरूर पोलीस स्टेशन अंतर्गत ‘गणराया पुरस्कार 2024’ वितरण सोहळा संपन्न; डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी आवाहन.!

शिरूर पोलीस स्टेशन तर्फे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचा सन्मान; शांतता समितीची बैठकीही पार पडली.

ताज्या घडामोडी मोबाइल वर मिळवा.फोटो वर क्लिक करा

शिरूर, [१६/०७/२५]: शिरूर पोलीस स्टेशन अंतर्गत सार्वजनिक गणेशोत्सव 2024 मध्ये उत्कृष्ट सामाजिक, पर्यावरणपूरक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करणाऱ्या तसेच विसर्जन मिरवणुकीत शिस्तबद्ध सहभाग घेणाऱ्या गणेश मंडळांना ‘गणराया पुरस्कार 2024’ प्रदान करण्यात आले. या सोहळ्यासोबतच आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शांतता कमिटीची बैठकही पंचायत समिती शिरूर येथे दुपारी 11:30 वाजता पार पडली.

या कार्यक्रमासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय श्री प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक शिरूर माननीय श्री संदेशजी केंजळे, विविध राजकीय, सामाजिक संघटना, पक्ष प्रतिनिधी पदाधिकारी, तसेच शिरूर शहर व उपनगरातील गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र बापू सानप यांनी केले. पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद वाढावा या उद्देशाने अशा कार्यक्रमांचे आयोजन दरवर्षी केले जाते, असे त्यांनी नमूद केले. गणराया पुरस्काराचे परीक्षक श्री. धापटे सर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मागील वर्षीचा गणपती उत्सव कायदे आणि संविधानाचे पालन करून साजरा झाला. आगामी काळातही कायद्याचे पालन करत, डीजे बंदी आणि शांतता राखत कार्यक्रम साजरे करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

याप्रसंगी शिरूर पोलीस निरीक्षक संदेशजी केंजळे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांतजी ढोले साहेब यांचे स्वागत केले. तसेच, रवींद्र बापू सानप यांनी पोलीस निरीक्षक संदेशजी केंजळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पोलीस निरीक्षक संदेशजी केंजळे यांनी ज्येष्ठ पत्रकार सतीशजी धुमाळ आणि सुप्रिया साकोरे यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

पोलीस निरीक्षक संदेशजी केंजळे यांनी कार्यक्रमाच्या मुख्य उद्देशावर प्रकाश टाकला. येत्या 27 ऑगस्ट रोजी येणाऱ्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने डीजेमुक्त गणेशोत्सव हे धोरण राबवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले साहेब यांनी आपल्या मनोगतात पोलिसांना गणेशोत्सव काळात प्रचंड ताण सहन करावा लागतो, परंतु नागरिक, गणेशोत्सव मंडळे आणि सामाजिक संघटना यांच्या सहकार्यामुळे तो ताण कमी होतो असे सांगून सर्वांचे आभार मानले. येणारा गणेशोत्सव अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करून, गणराया पुरस्कारांचे पुढील वितरण गणेशोत्सव झाल्यानंतर पुढील महिन्यात म्हणजेच सप्टेंबर 2025 मध्ये करण्याचा प्रयत्न करू असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या वर्षीच्या गणराया पुरस्कारांमध्ये हलवाई चौक मित्र मंडळ यांना प्रथम क्रमांक, डंबे नाला मित्र मंडळ यांना द्वितीय क्रमांक, तर कापड बाजार मित्र मंडळ यांना तृतीय क्रमांकाचे बक्षीस घोषित करण्यात आले.व इतर मंडळांनाही प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले

गणराया अवार्ड वितरण सोहळा क्षणचित्रे

गणराया अवार्ड वितरण सोहळा क्षणचित्रे

गणराया अवार्ड वितरण सोहळा क्षणचित्रे

गणराया अवार्ड वितरण सोहळा क्षणचित्रे

गणराया अवार्ड वितरण सोहळा क्षणचित्रे

शेअर करा

मुख्य संपादक- श्री.अनिल डांगे

निर्भय न्यूज लाईव्ह, हे एकमेव निर्भीड न्यूज पोर्टल आहे. निर्भय न्यूज लाईव्ह हे सर्व क्षेत्रातील बातम्या, निर्भयपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहे.अर्थातच आपल्या सर्वांची साथ तितकीच महत्त्वाची आहे.!आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी आपण ८१४९२३२२३५ या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये