सामाजिक आणि राजकीय कार्याची दखल; नाथाभाऊ शेवाळे यांचा दिल्लीत सन्मान. नाथाभाऊ शेवाळे यांना इंग्लंडच्या ‘बुक ऑफ एक्सलन्स’ कडून सर्वोच्च सन्मान!
निर्भय न्यूज लाईव्ह: कारेगाव प्रतिनिधी

* नाथाभाऊ शेवाळे यांना इंग्लंडच्या ‘बुक ऑफ एक्सलन्स’ कडून सर्वोच्च सन्मान
* सामाजिक आणि राजकीय कार्याची दखल; नाथाभाऊ शेवाळे यांचा दिल्लीत सन्मान
* एच. डी. देवेगौडा यांच्या उपस्थितीत नाथाभाऊ शेवाळे यांना ‘सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स’ प्रदान.
जनता दल सेक्युलर पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याची दखल घेऊन ‘ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंड’ या संस्थेने त्यांना ‘सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स’ देऊन सन्मानित केले आहे.
भारताचे माजी पंतप्रधान आणि जनता दल सेक्युलर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि KAMKUS, London चे संस्थापक प्रोफेसर डॉ. दिवाकर सुकुल यांच्या हस्ते दिल्ली येथे नाथाभाऊ शेवाळे यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
नाथाभाऊ शेवाळे यांच्या नेतृत्व गुणांची आणि महाराष्ट्रातील लोकांसाठी त्यांनी केलेल्या समर्पित कार्याची दखल या संस्थेने घेतली आहे. त्यांच्या तत्वनिष्ठ कामामुळे ते अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत, असे या संस्थेने म्हटले आहे.
या सन्मानाबद्दल नाथाभाऊ शेवाळे यांनी प्रतिक्रिया दिली:
“ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंड या आंतरराष्ट्रीय संस्थेने माझ्या कामाची दखल घेऊन मला सन्मानित केल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. भारताचे माजी पंतप्रधान आणि आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली मी आजवर काम करत आलो आहे आणि यापुढेही करत राहीन. या सन्मानामुळे माझी जबाबदारी वाढली आहे, याची मला जाणीव आहे. या सन्मानामुळे मिळालेल्या ऊर्जेतून मी जनतेच्या हितासाठी अधिक जोमाने काम करेन.”
नाथाभाऊ शेवाळे यांचे कार्य:
नाथाभाऊ शेवाळे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांनी जनता दल सेक्युलर पक्षाच्या माध्यमातून अनेक सामाजिक आणि राजकीय चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न आणि सामान्य जनतेचे प्रश्न त्यांनी नेहमीच लावून धरले आहेत.