देश विदेशराजकीय
Trending

मोठी बातमी:आम आदमी पक्षाची महिलांना मोठी भेट: महिला सन्मान योजना लागू 

निर्भय न्यूज लाईव्ह:प्रतिनिधी

ताज्या घडामोडी मोबाइल वर मिळवा.फोटो वर क्लिक करा

आम आदमी पक्षाची महिलांना मोठी भेट: महिला सन्मान योजना लागू

दिल्ली सरकारने गेल्या मार्च महिन्यात २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात महिला सन्मान योजना जाहीर केली होती.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने महिलांना मोठी भेट दिली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अतिशी यांनी दिल्लीतील महिलांसाठी ‘महिला सन्मान योजना’गुरुवारी लागू केली. या योजनेनुसार महिलांना दरमहा १००० रुपये देण्यात येणार आहे. दिल्लीतील १८ वर्ष पूर्ण झालेल्या सर्व महिलां या योजनेस पात्र असणार आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर महिला सन्मान निधी १५०० वरून २१०० रुपये करण्यात येणार असल्याचे दिल्लीच्या मुख्यमंत्री आतीशी यांनी स्पष्ट केले आहे.

 

आम आदमी पार्टी पक्षाचे मुख्यालयात दिल्लीचे मुख्यमंत्री अतिशी आणि आपचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी पक्षाच्या मुख्यालयात संयुक्त पत्रकार परिषदेत महिला सन्मान योजना लागू केल्याची घोषणा केली. यावेळी आपचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल म्हणाले की, दिल्ली सरकारच्या कॅबिनेट बैठकीत महिला सन्मान योजनेवर मोहर उमटवण्यात आली. या अंतर्गत जिल्ह्यातील महिलांना प्रत्येक महिन्याला १००० रुपये दिले जातील. या योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया आज शुक्रवारपासून सुरू झाली. लाभार्थी बनविण्यासाठी दिल्लीतील महिलांना मतदान कार्ड असणे आवश्यक आहे.

१८ वर्षाहून अधिक वयाच्या महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत.

मात्र, आयकर भरणाऱ्या महिलांना याचा लाभ मिळणार नाही. असे आपचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी नमूद केले. दिल्ली विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. परंतु निवडणुकीनंतर १००० नव्हे तर २१०० रुपये देऊ, असे वचन आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय नेते अरविंद केजरीवाल यांनी दिले. दिल्लीतील महिलांनी विधानसभा निवडणुकीत संपूर्ण ताकद पणाला लावावे ७० पैकी ६० पेक्षा अधिक जागावर आम आदमी पार्टीच्या उमेदवारांना विजयी करावे, असे आव्हान अरविंद केजरीवाल यांनी केले. दरम्यान, दिल्ली सरकारने गेल्या मार्च महिन्यात २४-२५ या आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात महिला सन्मान योजना जाहीर केली होती. यात महिलांना १००० रुपये देण्याची ठळक तरतूद करण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीनंतर हाच निधी २१०० रुपये करण्यात येणार आहे.

शेअर करा

मुख्य संपादक- श्री.अनिल डांगे

निर्भय न्यूज लाईव्ह, हे एकमेव निर्भीड न्यूज पोर्टल आहे. निर्भय न्यूज लाईव्ह हे सर्व क्षेत्रातील बातम्या, निर्भयपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहे.अर्थातच आपल्या सर्वांची साथ तितकीच महत्त्वाची आहे.!आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी आपण ८१४९२३२२३५ या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये