शिरूर शहरात उघड्यावर कचरा टाकल्यास होणार दंडात्मक कारवाई: मुख्याधिकारी प्रीतम पाटील
शिरूर: निर्भय न्यूज लाईव्ह प्रतिनिधी

शिरूर शहरात उघड्यावर कचरा टाकल्यास होणार दंडात्मक कारवाई: मुख्याधिकारी प्रीतम पाटील
शिरूर: निर्भय न्यूज प्रतिनिधी
शिरूर नगरपालिका हद्दीमध्ये उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर शिरूर नगर पालिका च्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा शिरूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी प्रीतम पाटील यांनी दिला आहे. शिरूर शहराच्या प्रत्येक भागामध्ये नगरपालिकेच्या वतीने कचरा संकलन करण्यासाठी घंटागाडी येत असून या घंटागाडी मध्ये नागरिक कचरा टाकत आहेत परंतु काही नागरिक आपला कचरा हा पटांगण, कोपरे , अडगळीच्या जागा, रस्त्याच्या कडेला कॅरीबॅगमध्ये बांधून टाकत असून यामुळे शहराचे विद्रूपिकरण होत आहे. जर आपल्या भागामध्ये घंटागाडी येत नसेल तर, शिरूर नगर परिषद स्वच्छता विभागांच्याकडे तक्रार करावी, परंतु घंटागाडी येऊनही कचरा जाणून- बुजून मोकळ्या जागेमध्ये जर टाकत असाल तर तुमच्यावर आता शिरूर नगर परिषद कर्मचारी पथकाची करडी नजर राहणार आहे.असा नागरिक कचरा टाकताना आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
यासाठी शिरूर नगर परिषदेच्या वतीने या कारवाईसाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आले असून या पथकामार्फत शिरूर शहरातील, मंगलमूर्ती नगर मधील मोकळ्या जागा, प्रीतम प्रकाश नगरचे पटांगण, रामलिंग रोड, गोलेगाव रोड, पांजरपोळ समोरील भाग, थिटे कॉलेज जवळ पुणे नगर बायपास या ठिकाणी तसेच शिरूर शहरातील विविध भागात उघड्यावर कचरा टाकणाऱ्या वर करडी नजर ठेवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
शिरूर शहरातील सर्व नागरिकांनी आपला कचरा उघड्यावर न टाकता नगर परिषदेच्या घंटागाडी मध्ये ओला सुका वेग वेगळा देण्याचे आवाहन केले असून उघड्यावर कचरा टाकताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे मुख्य अधिकारी प्रीतम पाटील यांनी सांगितले.
या सर्व बाबी पाहता नगर परिषदेत मार्फतही काही सुधारणा आवश्यक आहे.
[ शिरूर शहरातील प्रत्येक भागात ठराविक वेळेनुसार घंटागाडी येणे आवश्यक आहे. शिरूर शहरातील काही मुख्य बाजारपेठा सोडल्या तर, काही भागात अशी परिस्थिती आहे की, घंटागाडी कोणत्या वेळेला येईल हे स्वच्छता विभाग ही सांगू शकत नाही..!! त्यामुळे नाईलाजाणे कचरा नागरिक उघड्यावर टाकत आहे या सर्व बाबींचा विचारही नगरपरिषदेने जरूर करावा .!!अशी उद्विग्न प्रतिक्रिया निर्भय न्यूज प्रतिनिधीशी बोलताना नागरिकांनी दिली….]