श्रीगोंद्यात खळबळ: चर्च जमिनीच्या व्यवहारात नियमांचे उल्लंघन; तहसीलदार, नायब तहसीलदार निलंबित!
निर्भय न्यूज लाईव्ह: वृत्तसेवा

श्रीगोंद्यात खळबळ: चर्च जमिनीच्या व्यवहारात नियमांचे उल्लंघन; तहसीलदार, नायब तहसीलदार निलंबित..!!
श्रीगोंदा: श्रीगोंदा तालुक्यातील चर्च जमिनीच्या व्यवहारात मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. महसूल आणि वन विभागाच्या आदेशांचे उल्लंघन करून एका संस्थेचे नाव बदलून खाजगी व्यक्तींना जमिनीचे मालकी हक्क बहाल केल्याप्रकरणी श्रीगोंदा तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे आणि नायब तहसीलदार अमोल बन यांना निलंबित करण्यात आले आहे. या घटनेमुळे श्रीगोंदा तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
श्रीगोंदा शहरातील “दि कॉन्फरन्स ऑफ चर्चेस ऑफ खाईस्ट इतर वेस्टर्न इंडिया” या संस्थेच्या जमिनीचा व्यवहार वादग्रस्त ठरला आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे आणि नायब तहसीलदार अमोल बन यांनी शासकीय आदेशांमध्ये बदल करून “द कॅनेडीयन प्रेस ब्रिटेरियन मिशन” या संस्थेच्या नावाने जमिनीचे मालकी हक्क खाजगी व्यक्तींना दिले. या व्यवहारात नियमांचे उल्लंघन झाल्याचा तक्रारदारांचा आरोप आहे.
चौकशीत अनियमितता उघड
या प्रकरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर महसूल आणि वन विभागाने चौकशी केली. या चौकशीत शासकीय आदेशांमध्ये बदल करून खाजगी व्यक्तींना जमिनीचे मालकी हक्क देण्यात आल्याचे स्पष्ट झाले. तसेच, या व्यवहारात नियमांचे उल्लंघन झाल्याचेही आढळून आले.
कारवाई:
अप्पर सचिव प्रवीण पाटील यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे आणि नायब तहसीलदार अमोल बन यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. तसेच, या दोघांविरोधात महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम ३ चे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत विभागीय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.
श्रीगोंदा तहसील कार्यालयात खळबळ
या घटनेमुळे श्रीगोंदा तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे आणि नायब तहसीलदार अमोल बन यांना निलंबित ठेवण्यात आले आहे.