ब्रेकींग न्यूज:शिरूरमध्ये आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर दंगल नियंत्रण योजना रंगीत तालीम; 3 हॅन्ड ग्रॅनाईटचा वापर..!!
निर्भय न्यूज लाईव्ह: शिरूर प्रतिनिधी

शिरूरमध्ये आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर दंगल नियंत्रण योजना रंगीत तालीम; 3 हॅन्ड ग्रॅनाईटचा वापर..!
शिरूर (पुणे): आगामी ईद, गुढीपाडवा, रमजान महिना, श्रीराम नवमी, हनुमान जयंती आणि छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास या सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने आज (दि. 27 मार्च 2025) सकाळी 11:00 ते 11:30 या वेळेत शनी मंदिर परिसरात दंगल नियंत्रण योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली.
या तालमीत संभाव्य दंगलीची परिस्थिती हाताळण्यासाठी विविध उपाययोजनांची प्रात्यक्षिके करण्यात आली. या सरावादरम्यान 3 हॅन्ड ग्रॅनाईटचा वापर करून जमावाला पांगवण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. या तालमीत पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली 2 पोलीस उपनिरीक्षक आणि 40 पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
या तालमीचा उद्देश आगामी सणांच्या काळात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांची सज्जता तपासणे आणि त्यांना आवश्यक प्रशिक्षण देणे हा होता. या तालमीमुळे पोलिसांची सज्जता आणि समन्वय वाढण्यास मदत झाली आहे.
पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितले की, “आगामी सणांच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे प्रथम कर्तव्य आहे. या तालमीमुळे पोलिसांना संभाव्य परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण मिळाले आहे. नागरिकांनीही सण शांततेत साजरे करावेत आणि पोलिसांना सहकार्य करावे.”
या तालमीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.