रांजणगाव MIDC पोलिसांकडून सात आरोपींना २४ तासाच्या आत अटक, कोयत्याने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न
निर्भय न्यूज लाईव्ह: वृत्तसेवा

रांजणगाव MIDC पोलिसांकडून सात आरोपींना अटक, कोयत्याने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न
रांजणगाव: रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका १७ वर्षीय तरुणावर कोयत्याने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सात आरोपींना पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली आहे. ही घटना २३ मार्च २०२५ रोजी रात्री ९:०० वाजता कारेगाव येथे घडली.
घटनेचा तपशील:
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यश राजू धनवटे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, सौरभ श्रीराम राठोड याच्यावर आरोपींनी प्राणघातक हल्ला केला. आरोपींनी सौरभला “तु आमच्या ओंकार देशमुख नावाच्या मित्राला खुन्नस देऊन का बघितले? तुला माहीत आहे का ओंकार देशमुख कोण आहे? थांब तुला जिवंत सोडत नाही,” असे म्हणून धमकी दिली. त्यानंतर ओंकार देशमुख आणि रोहन बोटे यांनी कोयत्याने सौरभच्या पोटात, डोक्यात आणि पाठीत वार केले. इतर साथीदारांनीही त्याला मारहाण करून शिवीगाळ केली. या हल्ल्यात सौरभ गंभीर जखमी झाला असून त्याच्या जीवे मारण्याचा प्रयत्न झाला.
आरोपींची नावे आणि पत्ते:
या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत:
* शंकर जालिंदर करंजकर, वय १९ वर्षे, मूळ रा. कळंब, जि. धाराशिव.
* ओम दत्ता चव्हाण, वय १८ वर्षे, मूळ रा. धानोरा, जि. वाशिम.
* रोहन रघुनाथ बोटे, वय १८ वर्षे, मूळ रा. भानगाव, जि. अहिल्यानगर.
* ओंकार विजय देशमुख, वय १८ वर्षे, मूळ रा. डोनवाडा, जि. हिंगोली.
* गिरीश गोविंद कऱ्हाळे, वय २० वर्षे, मूळ रा. हिवरा, जि. हिंगोली.
* गोरख विठ्ठल मोरे, वय २२ वर्षे, मूळ रा. कृष्णानगर, जि. नांदेड.
* हर्षल सुरेश पारवे, वय २० वर्षे, मूळ रा. शिवानी, जि. हिंगोली.
सर्व आरोपी सध्या कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे येथे राहत होते. याव्यतिरिक्त, या गुन्ह्यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे, ज्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसी कारवाई:
गुन्ह्याची माहिती मिळताच, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले आणि रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास पथके रवाना केली. तांत्रिक माहिती आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी केज, जि. बीड येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी केज पोलिसांच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेतले.
रांजणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण आणि त्यांच्या पथकाने आरोपींना केज येथून ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला हजर केले. आरोपींना २५ मार्च २०२५ रोजी अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयाने २९ मार्च २०२५ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
तपासात सहभागी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी:
ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहा. पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक नीलकंठ तिडके, अविनाश थोरात, सहा. फौजदार दत्तात्रय शिंदे, पो.कॉ. उमेश कुतवळ, योगेश गुंड, प्रविण पिठले, पो.हवा. विजय सरजिने, विलास आंबेकर, अभिमान कोळेकर, माऊली शिंदे, रामेश्वर आव्हाड, तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील सहा. फौजदार तुषार पंधारे, पो.हवा. जनार्धन शेळके, संजय जाधव आणि केज पोलीस स्टेशनचे पो.नि. वैभव पाटील, सपोनि मांजरने, पोसई निकम यांनी सहभाग घेतला.
या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण करीत आहेत.