अजित दादा शिरूर-हवेलीतील शब्द खरा करणार का..?
शिरूर-हवेलीचा विद्यमान आ.अशोक पवार यांना लाल दिव्याची गाडी मिळणार..!

निर्भय न्यूज -शिरूर प्रतिनिधी
(दिनांक २१ऑक्टो २४)
महाविकास आघाडी कडून आमदार अशोक पवार यांची उमेदवारी निश्चित तर अजित दादा पवार गटाकडून उमेदवारी ज्ञानेश्वर (माऊली)कटके तर भाजपाकडून कोणता उमेदवार दिला जातो याकडे शिरूर हवेली जनतेचे लक्ष..
राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होताच शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे वारे वाहू लागले असून महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान “आमदार एड-अशोक पवार” यांची उमेदवारी निश्चित असल्याने त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. मात्र महायुतीकडून अद्याप उमेदवार जाहीर न झाल्याने महायुती कोण उमेदवार हा प्रश्न मतदारांना पडला आहे भाजपा+ शिंदे गटाची शिवसेना पक्षांच्या जागा वाटपाच्या वादात उमेदवारी जाहीर करण्यास विलंब होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे आहे.
त्यातच शिरूर-हवेलीतील मतदारसंघातील नागरिकांना आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी ¶¶ उज्जैन तीर्थयात्रा कडून आणणारे आणि मतदारांमध्ये अल्पावधीत लोकप्रिय झालेले माऊली आबा कटके यांनी अजितदादा पवार राष्ट्रवादी गटात प्रवेश केल्याने शिरूर हवेलीचा राजकारणामध्ये खळबळ उडवून माजल्याचे दिसून येत असून येणारी विधानसभा निवडणुकीत काटे-की टक्कर पाहावयास मिळणार असल्याचे राजकीय विश्लेषकाकडून बोलले जात आहे ¶¶
महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाचे शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक ज्ञानेश्वर (माऊली) कटके यांच्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक कार्यकर्त्यांनी त्यांचा प्रचार-प्रसार सुरू केला होता त्यातच त्यांनी दादा गटाच्या पक्षाकडे ज्ञानेश्वर माऊली कटके यांनी शिरूर हवेली उमेदवारीसाठी पक्षप्रवेश केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये कोणता, झेंडा घेऊ हाती…!!!! अशी म्हणण्याची वेळ आली आहे..!
महायुतीतील दुसरा घटक पक्ष भाजप या मतदारसंघावर १९९५ पासून यांचा उमेदवार असून ¶¶ भाजप तर्फे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रदीप कंद यांची उमेदवारी निश्चित मानली जाते¶¶
मात्र महायुतीत राष्ट्रवादीच्या प्रवेशामुळे त्यांनी या मतदारसंघावर दावा केला आहे त्यामुळे अद्याप पर्यंत या जागेचा प्रश्न सुटला नसून दोन्ही पक्षाने आप-आपला दावा न सोडल्यामुळे भविष्यात कोण उमेदवार असेल हे सांगणे अवघड आहे. मात्र भाजपकडे हा मतदारसंघ गेल्यास तिहेरी लढत अटळ असून जर मतदार संघ राष्ट्रवादीकडे गेल्यास राष्ट्रवादी कडून माऊली कटके उमेदवार असू शकतात असा दावा काही दिवसांपूर्वी राजकीय विश्लेषकांनी केला होता तो दावा आता खरा ठरत असल्याची दिसत आहे..
शिरूर हवेलीतील सुज्ञ जनताच ठरवेल दादांचा शब्द खरा ठरेल की, शिरूर हवेली मध्ये साहेबांचा शब्द खरा ठरवून लाल दिव्याची गाडी येईल…
शिरूर हवेलीतील एक दुसरे दादा प्रदीप दादा कंद यांची एवढ्या दिवसाची मेहनत कामाला येईल…? या सर्व प्रश्नांची उत्तरे येणारा काळच सांगेल हे मात्र नक्की..