ब्रेकिंग न्यूज शिरूर तालुक्यातील पंचतारांकित रांजणगाव MIDC २१ बांगलादेशी घुसखोरांना अटक..!
रांजणगाव प्रतिनिधी

रांजणगाव एमआयडीसी चा परिसर बांगलादेशी घुसखोर व नक्षलवादी यांचा वास्तव्याचा अड्डा तर बनत नाही ना..!
रांजणगाव:प्रतिनिधी
कारेगाव,ता.शिरूर येथे बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड काढून वास्तव्य करत असणाऱ्या २१ बांगलादेशी घुसखोरांना पुणे ग्रामीण दहशतवादी पथक व स्थानिक गुन्हे अन्वेषन पथक व रांजणगाव पोलीस स्टेशन त्यांच्या संयुक्त पथकाने अटक केली आहे. त्यांना शिरूर येथील प्रथम वर्ग न्यायालय येथे हजर केले असता २४ऑक्टोबर २४ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अटक झालेल्या पैकी १५ पुरुष ४ महिला २ तृतीयपंथीयाचा समावेश आहे.यामुळे या परिसरात खळबळ उडाली असून काही वर्षांपूर्वी याच परिसरातून नामचीन नक्षलवाद्यांना सुद्धा अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा २१ बांगलादेशी घुसखोरांना अटक केल्याने रांजणगाव पंचतारांकित एमआयडीसी घुसखोरांचा, नक्षलवाद्यांचा,दहशतवाद्यांचा वास्तव्याचे ठिकाण तर बनत नाही ना..? याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. याबाबत प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
अजमल सरतखान उर्फ हसिफ खान(वय – ५०), मोहम्मद अकबर अजीज अकबर सरदार (वय – ३२ वर्ष) शफिक आलिया शेख वय वीस वर्ष हुसेन मुखीद शेख (वय ३०वर्ष) तरीकुल अतियार शेख (वय३८वर्ष) मोहम्मद उमर फारूक बाबू उर्फ बाबू बुक्तियार शेख (वय ३२ वर्ष) शाहीन शहाजान शेख (वय ४४ वर्ष) मोहम्मद हुसेन शेख (वय ३२ वर्ष) अकबर दफादार (वय३५वर्ष) इब्राहिम काजोल शेख (वय३५वर्ष) फरीद अब्बास शेख (वय ४८ वर्ष) मोहम्मद सद्दाम अब्दुल सखावती (वय ३५ वर्ष) मोहम्मद अब्दुल हबीब रहमान सरदार (वय ३२वर्ष) आलिया तहकील शेख (वय६० वर्ष) मोहम्मद इसराइल फकीर (वय ३५वर्ष) फिरोजा मुताकीन शेख (वय २० वर्ष) लिपी या हसमुख मुल्ला (वय ३२ वर्ष) सलमा मलिक रोशन मलिक (वय२३वर्ष) हिना मुल्ला जुल्फी कार मुल्ला (वय ४० वर्ष) सोनदीप उर्फ काजोल बासुदीप विशेष (वय३०वर्ष) अनुर शहदाता मुल्ला (वय२५वर्षे) सर्व सध्या राहणार-कारेगाव ता. शिरूर,जिल्हा, पुणे. मूळ राहणार- बांगलादेश यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक २१ ऑक्टोबर २०२४रोजी दहशतवाद विरोधी शाखा पुणे ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार हे आपल्या पथकासह रांजणगाव पोलीस स्टेशन परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असताना, त्यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार विशाल गव्हाणे यांना गोपनीय माहिती मिळाली की, रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कारेगावच्या परिसरात काही बांगलादेशी नागरिक हे बेकायदेशीर राहत आहे अशी खात्रीला एक माहिती मिळाली होती. सदर मिळालेल्या माहितीवरून पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांचे मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी शाखेमधील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन कडील पोलीस पथक कारेगाव परिसरामध्ये मिळालेल्या बातमीच्या आधारे शोध घेण्यात आला असून कारेगाव तालुका शिरूर हद्दीमध्ये भाड्याने राहण्यास असणारे १५ पुरुष ४ महिला व २ तृतीयपंथीयांना ताब्यात घेण्यात आले व सर्वांना रांजणगाव पोलीस स्टेशनमध्ये आणून त्यांची चौकशी केली असता,बांगलादेशी नागरिक असून त्यांनी भारत देशात बेकादेशीर रित्या भारत-बांगलादेश सीमा ओलांडून कोणताही वैद्य भारतीय पारपत्र परवाना धारण करत नसताना देखील भारतामध्ये प्रवेश करून महाराष्ट्र राज्य पुणे जिल्ह्यातील, कारेगाव, तालुका शिरूर. येथे बनावट भारतीय देशाचे आधार कार्ड, पॅन कार्ड व मतदान कार्ड धारण करून वास्तव्य करत असल्याचे निष्पन्न झाले आहे त्यांच्यापैकी ९ व्यक्तीकडे बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड व १ इसमा कडे बनवाट मतदान कार्ड धारण करून वास्तव्य करत असल्याचे आढळून आले आहे. या सर्वांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख पुणे, विभागाचे अध्यक्ष चोपडे शिरूर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, स्थानिक गुन्हे अनिवेष शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शीळीमकर, रांजणगाव एमआयडीसी पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली, दहशतवाद विरोधी शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, सहाय्यक फौजदार विशाल गव्हाणे, पोलीस हवालदार विशाल बोर्डे, रवींद्र जाधव, पोलीस कॉन्स्टेबल राजू मोहसीन शेख, ओंकार शिंदे तसेच रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहाय्यक फौजदार डी आर शिंदे, पोलीस हवलदार विजय सरजीने, विलास आंबेकर, पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, महिला पोलीस हवालदार विद्या बनकर महिला पोलीस कॉन्स्टेबल शितल रौंदळ यांचे पथकाने केले आहे गुन्हाचा पुढील अधिक तपास रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन कडील पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात करत आहेत. भारतीय न्याय संहिता कलम ३३६(२)३३६(३) ३८,३४०(२)तसेच सहकलम भारतीय पारपत्र अधिनियम १९२० चे कलम ३ विदेशी अधिनियमन १९४६चे कलम १४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्यातील आरोपींना माननीय,प्रथम वर्ग, न्यायदिंडाधिकारी सो. शिरूर कोर्टात हजर केले असता मा.हुकूम|| कोर्टाने यांना दिनांक २४.१०.२४2 रोजी पर्यंत पोलिस कस्टडी रिमांड दिलां आहे.