शिरूर तालुक्याचे ज्येष्ठ माजी .आमदार सूर्यकांत जी पलांडे यांच्याकडून आमदार अशोक पवार यांच्या उमेदवारीला विरोध

शिरूर तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्याचे कामधेनु असणारा साखर कारखाना त्यावर अवलंबून असणारे तब्बल २० २५ हजार सामान्य उत्पादक शेतकऱ्यांची असलेला घोडगंगा साखर कारखाना बंद पडण्याला आमदार अशोक पवार हेच जबाबदार असल्याने त्यांना उमेदवारी देऊन शेतकरी विरोधी भूमिका घेणारा पक्ष म्हणून प्रतिमा उभी करू नये.
यासाठी आपण स्वतः आणि पुणे जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब नरके आम्ही दोघांनी शिरूर हवेली मधून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुलाखती दिल्याची माहिती माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांनी दिली. शिरूरच्या शेतकऱ्यांचे अर्थकारण गेली २५ वर्ष रावसाहेब दादा पवार घोडगंगा साखर कारखान्यावर अवलंबून असताना २००९ पर्यंत कारखान्याचे अध्यक्ष म्हणून आमदार अशोक पवार यांनी कारखाना उत्तम चालविला , मात्र सन २००९ पासून जसा त्यांच्याशी संबंधित असलेल्या ” कृपा शुगर ” या खाजगी कारखान्याचे उभारणी .
तशी गोडगंगाची वाताहत होऊ लागली, कर्मचाऱ्यांचे पगार थकले, ऊस दरात नीचांकी, सामान्य सभासदांना सन्मान नाही ,मृत सभासदांच्या वारसाची नोंद , स्वतःच्या मुलाला संचालक करत अध्यक्ष केले तसेच मुलगा पत्नी त्यांना राजकारणातील सन्मानाचे पदे देताना कार्यकर्त्यांना काही द्यायचे ठरले ; राजकारणातून हद्दपार करण्याच्या पद्धतीने माजी सभापती मोनिका , माजी सभापती शशिकांत दसगुडे,माजी जिल्हा परिषद सदस्य कुसुम आबा राजे मांढरे, राजेंद्र जगदाळे आदीसारखी खूप मोठी फळी राजकारणाच्या वेगळ्या वाटेवर आली. त्यांनी थेट अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत व इतर पक्षात आपली वाटचाल सुरू केली आहे.असेच जर चालले तर शरदचंद्र पवार गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते कमी कमी होत जातील व खोगीरांची भरती वाढेल अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.
सूर्यकांत जी पलांडे यांची प्रतिक्रिया
संपूर्ण पक्ष खाजगी प्रॉपर्टी समजून हुकुमशाही पद्धतीने वागवून पुन्हा पक्षाकडून उमेदवारी मागण्याचे धाडस केलेल्या आमदार पवार यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये, अशी मागणी मुलाखतीवेळी ज्येष्ठनेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षाचे पक्षश्रेष्ठीपुढे पुढे मांडली. केवळ निष्ठावंत म्हणून अशोक पवार यांना उमेदवारी दिली जात असेल तर आम्ही दोघेही गेली ४० वर्ष शरद पवार यांचे निष्ठावंत असून; सामान्य ऊस उत्पादकांसाठी पक्षश्रेष्ठी आम्हाला उमेदवारी नक्की देतील!
सूर्यकांत पलांडे माजी आमदार