मोठी बातमी:१० लाख ९५००० हजार रुपये घेवून ऊस तोडणी कामगार देतो म्हणून पसार झालेल्या मुकादमास शिरूर पोलीसाकडून अटक…
निर्भय न्यूज लाईव्ह: वृत्तसेवा

१० लाख ९५००० हजार रुपये घेवून ऊस तोडणी कामगार देतो म्हणून पसार झालेल्या मुकादमास शिरूर पोलीसाकडून अटक..
ऊस तोडणी कामगार देतो म्हणून १० लाख ९५००० घेवून मुकादम पसार झाला होता दरम्यान शिरूर पोलिसांनी पसार झालेल्या मुकदमास घटनेतील आरोपीला अटक केली आहे आणि पुढील तपास शिरूर पोलीस हे करत आहे.
•शेतकऱ्यांची १० लाख ९५०० रुपयांची फसवणूक•
ऊस तोडणी करणाऱ्या टोळीच्या नावाखाली १० लाख ९५००० रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या मुकादमास शिरूर पोलीस स्टेशन गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे.
शिरूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ४०८/२०२४ भारतीय न्याय संहिता कायदा कलम ३१८/३(५)मधील फिर्यादी श्री बबन बाळासाहेब कोळपे वय ३८ वर्ष व्यवसाय शेती,रा. मंडवगण फराटा तालुका – शिरूर जिल्हा – पुणे यांनी फिर्याद दिली होती.ती अशी की दिनांक ४/०६/२०२३ ते ०१/१०/२०२४ या कालावधीच्या दरम्यान आरोपी
१) चंद्र ताराचंद राठोड
२)ताराचंद जयराम राठोड
३)मुकादम अनिल ताराचंद राठोड
सर्व रा.पिंपळ खेड,गोरखपूर तांडा,तालुका – चाळीसगाव,जिल्हा – जळगाव.यांनी मिळून यातील फिर्यादीस’ उसतोडीसाठी मजुरांची टोळी देतो’ असे सांगून वेळोवेळी १० लाख ९५००० रू फिर्यादी यांच्याकडून घेवून फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केल्याबाबत शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याचा तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रमेश कदम यांच्या कडे देण्यात आला होता.
•शिरूर पोलीस स्टेशनच्या शोध पथकाचे कौतुकास्पद कामगिरी•
सदर गुन्हातील शेतकऱ्याची झालेल्या आर्थिक फसवणुकीची गंभीरता लक्षात घेऊन शिरूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संदेश जी केंजळे यांनी तपास पथकाला आरोपीचा शोध घेण्यासाठी आदेशीत केले होते.
•गुप्त खबऱ्या मार्फत मिळाली टीप•
त्या अनुषंगाने तपास पथकाचे पोलीस सब इन्स्पेक्टर श्री.शुभम चव्हाण,पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप,पोलीस अंमलदार विनोद काळे,नितेश थोरात,सचिन भोई,विजय शिंदे,नीरज पिसाळ,निखिल रावडे,अजय पाटील हे पथक आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार नितेश थोरात यांना खबऱ्याकडून बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी मुकादम अनिल ताराचंद राठोड हा शिरूर येथील कुकडी कॉलनी येथे येणार आहे.
•शिरूर पोलिसांनी रचला सापळा•
कुकडी कॉलनी येथे सापळा लावून शिताफीने शिरूर पोलिसांनी मुकादम अनिल ताराचंद राठोड यांस ताब्यात घेतले. पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
•सदर कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे, उपविभागीय श्री प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक श्री संदेश केंजळे, यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस स्टेशन शोध पथकाचे पोलीस सब इंस्पेक्टर शुभम चव्हाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नीरज पिसाळ, निखिल रावडे, विनोद काळे, अजय पाटील यांच्या पोलीस पथकाने ही कामगिरी पार पाडली आहे.