इंडोेशियात ज्वालामुखीचा स्फोट; सहा जणांचा कोळसा

इंडोनेशिया फ्लोरेस बेटावरील ज्वालामुखीत झालेल्या उद्रेकामुळे जवळपास सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला. रविवारी – सोमवारच्या मध्यरात्रीनंतर ज्वालामुखीत एका पाठोपाठ एक स्पोट झाल्याने जवळपास ६,५०० फूट उंचीपर्यंत राख फेकली गेली. जवळच्या एका गावावर तप्त राख पसरल्याने अनेक घरे जळून खाक झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. घराच्या िगार्याखाली अनेक जण अडकल्याची शक्यता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
फ्लोरेस बेटावरील माउंट लेवो – टोबी लाकी – लाकि ज्वालामुखी उद्रेक झाल्याने एकच खळखळ उडाली. संपूर्ण आकाश ज्वालामुखीच्या घरात राखेने भरून गेले होते. ज्वालामुखीच्या पायथ्याशी असलेल्या एका गावातील अनेक घरे जळून खाक झाली. सुरुवातीला ज्वालामुखीच्या उद्रेकात ९ जण ठार झाल्याचे सांगण्यात आले होते; परंतु नंतर सहा जण मृत्यूमुखी पडल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन संस्थेने दिले आहे.
उद्रेका नंतर ज्वालामुखीच्या धोक्याची पातळी वाढविण्यात आली आहे. लेवोटोबी ज्वालामुखी गत काही दिवसापासून सक्रिय झाला असून,त्यातून मोठ्या प्रमाणात लावारस बाहेर पडत आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जवळपास ६ गावातील १० हजाराहून अधिक लोकांना फटका बसला आहे.