नांदेड जिल्ह्यातील काळजाला पिळवटून टाकणारी घटना..
निर्भय न्यूज लाईव्ह: वृत्त सेवा

नांदेड जिल्ह्यातील काळजाला पिळवटून टाकणारी घटना..
निर्भय न्यूज लाईव्ह:
नांदेड जिल्ह्यातील गाव मिनकी, ता. बिलोली, जिल्हा – नांदेड येथे काळजाला पिळवटून टाकणारी घटना घडली आहे.
उदगीर येथील एका शाळेत दहावी वर्गात शिकणारा ओमकार लक्ष्मण पैलवार १६ वर्षाचा मुलगा मकर संक्रातीनिमित्त आपल्या गावी मीनकी या ठिकाणी आला होता. घरी येऊन सणानिमित्त नवीन कपडे आणि शिक्षणाचे साहित्य घेऊन देण्याची वडिलांकडे मागणी केली, वडील राजेंद्र पैलवार यांनी सध्या आपल्याकडे पैसे नाहीत, पैसे आले की; तुला नवीन कपडे आणि पुस्तक, वह्या घेऊन देईन असे सांगितले.
पण मुलाच्या मनात कसले विचार आले त्यालाच ठाऊक..! तो सकाळी उठला शेतात गेला आणि गळपास लावून स्वतःला तिथेच संपवून घेतले.. मुलगा (ओमकार) घरी आला नाही. म्हणून आई-वडील, भाऊ सर्वांनी शोध घ्यायला सुरुवात केली. शोधत- शोधत वडील शेताकडे आले, पाहतात तर काय मुलगा झाडाच्या फांदीला लटकत होता.
मुलाने फाशी घेतल्याची, कसलीच माहिती घरच्या न देता वडीलही लगेच झाडावर चढले, अलगद मृतदेह खाली सोडून, त्याला जागेवर झोपवले आणि मुलाने( ओमकार) ज्या दोरीने फाशी घेतली. त्याच दोरीने, त्या झाडावर,त्याच क्षणी वडिलांनीही फाशी घेऊन त्या झाडाखाली स्वतःचे जीवन संपवले.
प्रश्न हा नाही की…वडीलांनी असे का केले..?
प्रश्न हा आहे की..
देशात राजकारण्यांकडे… आपण विचार पण,
करू शकत नाही.! एवढा पैसा कसा काय आहे. !!
पण जो रात्रंदिवस कबाड कष्ट करतो, त्यांच्याकडे त्यांच्या लेकरा बाळासाठी ही पैसा शिल्लक का नसतो..?
थोडा विचार जरूर करा…
बदल झालाच पाहिजे…!!