चीन मधून आलेल्या नवीन विषाणू बाबत चिंतेचे कारण नाही: डॉ.नितीन अंबाडेकर,संचालक आरोग्य सेवा,पुणे
निर्भय न्यूज लाईव्ह:वृत्तसेवा

-
चीन मधून आलेल्या नवीन विषाणू बाबत चिंतेचे कारण नाही: डॉ.नितीन अंबाडेकर,संचालक आरोग्य सेवा,पुणे
एच एम पी व्ही राज्यात प्रादुर्भाव नाही..चिंता नको काळजी घ्या..!!
निर्भय न्यूज लाईव्ह:वृत्तसेवा
सद्या चीन मध्ये मानवी मेटान्यूमोव्हायस (एच एम पी व्हीं) या श्वसन विषयक आजाराच्या विषाणूचा उद्रेक झाला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागानेही खबरदारी म्हणून सर्व जिल्ह्यांना निर्देश दिले आहेत.
महाराष्ट्रात अद्याप श्वसन विषयक संसर्गाच्या रुग्णाच्या संकेत वाढ झाली नसल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे. तरीही नागरिकांनी संसर्ग बाबत सावध राहावे, असे निर्देश आरोग्य विभागाचे संचालक डॉक्टर नितीन अंबाडेकर यांनी सर्व जिल्ह्यांना दिले आहे. या अनुषंगाने केंद्रीय आरोग्य सेवा महासंचालक डॉ.अतुल गोयल आणि राष्ट्रीय रोग निवारण केंद्र यांची काही दिवसापूर्वी संयुक्त बैठक झाली. त्यांनी एच एम पी व्ही बाबत निवेदन प्रसिद्ध केले आहे.
त्यानुसार राज्याच्या आरोग्य विभागाने सूचना केल्या आहेत. एच एम पी व्ही श्वसन संस्थेला बाधित करणारा विषाणू आहे. तो श्वसन मार्गाच्या वरील भागातील संसर्गास कारणीभूत ठरतो. ‘एच एम पी व्ही’तीव्र श्वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण असून हा विषाणू सर्वप्रथम नेदरलँडला २००१ मध्ये आढळला. हा संसर्ग एक हंगामी आजार असून फ्लू प्रमाणे हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्धवतो.
सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले असता, २०२३ च्या डिसेंबरच्या तुलनेत मागील डिसेंबरमध्ये श्वसन विषयक आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली नाही, असे दिसून आले आहे. तथापि खबरदारी म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी चलाचे पालन करावे, असे आव्हान आरोग्य विभागाने केले आहे.
•खबरदारी म्हणून खालील उपाय करावे..
•खोकला किंवा शंका येत असल्यास तोंड व नाक रुमाल किंवा अतिशय पेपरने झाका
•साबण, पाणी अल्कोहोल आधारित सेनेटायझरने हात वारंवार धुवा
•ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणापासून दूर राहा
•भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक अन्न खा
•संक्रमण कमी करण्यासाठी पुरेशी हवा खेळती राहील याची दक्षता घ्या