सावधान:शिरूर मध्ये मॅन होल बनले मुर्त्यूचा सापळा
निर्भय न्यूज लाईव्ह:शिरूर प्रतिनिधी

सावधान:पुढे मुर्त्यूचा सापळा आहे
शिरूर मधील भुयारी गटाराच्या मॅन होल ची पोलखोल..असमतल झाकण बनले अपघाताचे द्वार
शिरूर मधील बस स्टँड समोरून सुखकर्ता मेडिकलच्या बाजूने नेताजी सुभाष चौकाकडे जो रस्ता जातो कोळपकर भांडे वाले च्या दुकानासमोर भुयारी गटार योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या मॅन होल चे झाकण असे का.. लावले ..? का तुटले आहे..! म्हणून एखादा अपघात झाल्यानंतरच आम्ही बदलणार नगरपालिका प्रशासनाने या मानसिकतेमुळे ते ठेवले आहे, हा मोठा संशोधनाचा विषय आहे.

भर रस्त्यावरील मॅन होल चा खड्डा टाळण्यासाठी नादात वाहने एकमेकांना धडकताहेत.आतापर्यंत अनेकांना किरकोळ दुखापती झाल्या असतानाही शिरूर नगरपालिकेला गांभीर्य नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांना सर्वसामान्य माणसाची चिंता नसल्याचे दिसत आहे.
वरदळीच्या रस्त्यावर झालेला हा मॅन होल खड्डा म्हणजे अनेक अपघातांना आमंत्रण देणारा मृत्यूचा सापळाच आहे.कारण सकाळ- संध्याकाळी पाल्यांना सोडवण्यासाठी व घेण्यासाठी,खरेदी साठी अनेक नागरिक याचं रस्त्याने ये – जा करतात,मेन बाजार बाजारपेठेकडे जाणारा हा एक मुख्य रस्ता या रस्त्यावर कायमच गर्दी असते.आता या प्रश्नाकडे नगर पालिका प्रशासन कश्या पद्धतीने पाहते. अशा छोट्या- मोठ्या प्रश्नांसाठी सुद्धा सामाजिक कार्यकर्त्यांना आंदोलन करावे लागेल का ? की,त्या मेन होल वरील झाकण बसवून नगरपालिका सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देईल.
शिरूर शहरात अशा अनेक प्रकारचे मृत्यूचे सापळे आहेत आणि नागरिक त्याबाबत निर्भय न्यूज प्रतिनिधीशी संपर्क साधून पोस्ट टाकत आहे. आम्हीही आमची नैतिक जबाबदारी समजून त्या पोस्टला नागरिकांच्या न्याय हक्कासाठी प्रसिद्धी देऊन आम्ही आमची नैतिक जबाबदारी सांभाळणार आहोत.