देश विदेश

युपी,पंजाब व केरळातील पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमात केंद्रीय निवडणूक आयोगा कडून मोठा बदल

निर्भय न्यूज लाईव्ह

ताज्या घडामोडी मोबाइल वर मिळवा.फोटो वर क्लिक करा

युपी, पंजाब व केरळात १३ ऐवजी २० नोव्हेंबरला मतदान

सण असल्यामुळे पोट निवडणूक कार्यक्रमात बदल 

नवी दिल्ली: महाराष्ट्र व झारखंड विधानसभेसोबत होणाऱ्या अनेक राज्यातील पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमात केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी मोठा बदल केला आहे. गुरुनानक जयंती अर्थात प्रकाश पर्व व इतर सण लक्षात घेता उत्तर प्रदेश, पंजाब आणि केरळातील १४ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचे मतदान १३ ऐवजी २० नोव्हेंबरला घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे.

उत्तर प्रदेशात ९, पंजाब मध्ये ४, आणि केरळात विधानसभेच्या १ जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. निवडणूक आयोगाने गेल्या १५ ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र व झारखंड विधानसभा निवडणुकी सोबत हा कार्यक्रम जाहीर केला; पण काँग्रेस, भाजप, बहुजन समाज पक्ष आणि राष्ट्रीय लोक दलासह विविध राजकीय पक्षाने निवडणूक वेळापत्रक बदल करण्याची विनंती केली.

ऐन सणासुदीत मतदान घेतल्यास नागरिक मतदानाकडे पाठ फिरवू शकतात. त्यामुळे मताचा टक्का घसरू शकतो, असा तर्क या राजकीय पक्षांनी दिला.

केरळमधील पलककट विधानसभा मतदारसंघातील नागरिक १३ ते १५ नोव्हेंबर दरम्यान कल्पति रथोत्सव सण साजरा करतात. तर पंजाब मध्ये श्री गुरुनानक देव यांची ५५५वी जयंती अर्थात प्रकाश पर्व १५ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. या निमित्ताने १३ नंबर पासून अखंड पाठ वाचन केले जाते. उत्तर प्रदेशात कार्तिक पौर्णिमेपूर्वी ३ते४ दिवस लोक यात्रा करतात. यंदाची कार्तिक पौर्णिमा १५ नोव्हेंबर रोजी आहे.

त्यामुळे मतदान कार्यक्रम बदलण्याचा आग्रह विविध राजकीय पक्षांनी केला. त्यानंतर निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश, पंजाब व केरळातील पोटनिवडणुकीसाठीचे मतदान १३ ऐवजी २० नोव्हेंबर रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. या राज्यातील १४ वगळता व उवरतीत विधानसभेच्या ते ३३ व वायनाड तथा नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचे मतदान ठरल्यावेळी १३ नोव्हेंबर रोजी घेणार आहे. तसेच मतमोजणी सुद्धा निर्धारित २३ नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले.

       दरम्यान उत्तर प्रदेशातील मीरपुर, कुंदरकी,गाझियाबाद, खैर, करहल, सिसमाऊ, फुलपुर,कटेहरी आणि माजवा यां ९ तर पंजाब मध्ये डेरा बाबा नानक, छब्बेवाल, गिद्देरबाहा आणि बर्नाळा या ४ मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे.

शेअर करा

मुख्य संपादक- श्री.अनिल डांगे

निर्भय न्यूज लाईव्ह, हे एकमेव निर्भीड न्यूज पोर्टल आहे. निर्भय न्यूज लाईव्ह हे सर्व क्षेत्रातील बातम्या, निर्भयपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहे.अर्थातच आपल्या सर्वांची साथ तितकीच महत्त्वाची आहे.!आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी आपण ८१४९२३२२३५ या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये