ताज्या घडामोडी
Trending

शिरूरमध्ये साई लंच होम शेजारी मार्बल च्या दुकानात धाडसी चोरी: महिलेची पर्स आणि लाखोंचा ऐवज लंपास

निर्भय न्यूज लाईव्ह:वृत्तसेवा

ताज्या घडामोडी मोबाइल वर मिळवा.फोटो वर क्लिक करा

शिरूर: पुणे-नगर महामार्गावर शिरूरजवळ बस बंद पडल्यानंतर उतरलेल्या एका महिलेची पर्स अज्ञात चोरट्याने भरदिवसा लंपास केली. या पर्समध्ये सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा सुमारे १ लाख ६ हजार ५०० रुपयांचा ऐवज होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शांतम्मा या त्यांच्या पती आणि मुलासोबत २१ एप्रिल २०२५ रोजी सकाळी साडेसात ते साडेआठच्या सुमारास नगरहून पुण्याकडे जात असताना त्यांची बस शिरूर तालुक्यातील गुजरमळा येथे व्हिजन इंटरनॅशनल स्कूलजवळ बंद पडली. त्यामुळे बसमधील सर्व प्रवासी खाली उतरले. शांतम्मा, त्यांचे पती आणि मुलगा रस्त्याच्या पलीकडे साई लंच होमशेजारी असलेल्या मार्बलच्या दुकानात मार्बलचे मंदिर पाहण्यासाठी गेले.

मार्बलचे मंदिर पाहत असताना शांतम्मा यांनी त्यांची भगव्या रंगाची पर्स दुकानाबाहेर विक्रीसाठी ठेवलेल्या मार्बलच्या मंदिराजवळ ठेवली. मंदिर पाहून झाल्यावर सकाळी साडेआठच्या सुमारास ते पुन्हा बसमध्ये बसण्यासाठी निघाले. पर्स घेण्यासाठी गेल्यावर शांतम्मा यांना ती पर्स ठेवलेल्या ठिकाणी दिसली नाही. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला, परंतु पर्स मिळून आली नाही.

या पर्समध्ये २० हजार रुपये किमतीची भगव्या रंगाची पर्स, ७० हजार रुपये किमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची पिळ्याची अंगठी, ४५ हजार ५०० रुपये किमतीचे ६.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट, ८८ हजार रुपये रोख रक्कम (पाचशेच्या १६० नोटा, दोनशेच्या २०० नोटा आणि शंभरच्या २० नोटा) आणि ३ हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल फोन (एअरटेल सिम कार्ड क्रमांक ८२१७४०१४८९) असा एकूण १ लाख ६ हजार ५०० रुपयांचा ऐवज होता.

चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर शांतम्मा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी परिसरात शोध घेतला, मात्र पर्स न सापडल्याने अज्ञात चोरट्याने ती चोरून नेल्याची खात्री झाली. त्यानंतर ते तत्काळ शिरूर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी न येता आळंदीला गेले आणि आज (२६ एप्रिल २०२५) त्यांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

शिरूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३७९ (चोरी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार टेंगले (क्रमांक २४९९) आणि पो.हवा. जगताप (क्रमांक २५) पुढील तपास करत आहेत. प्रभारी अधिकारी मा. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोरट्याचा शोध सुरू आहे.

शेअर करा

मुख्य संपादक- श्री.अनिल डांगे

निर्भय न्यूज लाईव्ह, हे एकमेव निर्भीड न्यूज पोर्टल आहे. निर्भय न्यूज लाईव्ह हे सर्व क्षेत्रातील बातम्या, निर्भयपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहे.अर्थातच आपल्या सर्वांची साथ तितकीच महत्त्वाची आहे.!आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी आपण ८१४९२३२२३५ या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये