“वाट चुकलेल्या अल्पवयीन मुलांकरीता रांजणगाव MIDC पोलिसांकडून अनोख्या “स्पंदन” उपक्रमाचे आयोजन”
निर्भय न्यूज लाईव्ह:वृत्तसेवा

“वाट चुकलेल्या अल्पवयीन मुलांकरीता रांजणगाव MIDC पोलिसांकडून अनोख्या “स्पंदन” उपक्रमाचे आयोजन
रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगीक वसाहत असल्याने कामगारांची संख्या दिवसें दिवस वाढत आहे. त्यामुळे अल्पवयीन मुले गुन्हेगारी मार्गावर जावु नयेत तसेच जे अल्पवयीन मुलांविरुध्द यापुर्वी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत अशा अल्पवयीन मुलांना रोजगार मिळुन देण्यासाठी “मिशन परिवर्तन” मार्फत पुणे ग्रामीण पोलीस व कला, क्रिडा, साहित्य शांतीदुर परिवार आयोजीत “स्पंदन” उपक्रमाचे रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन कडुन उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
सदर उपक्रमामध्ये रांजगाव MIDC पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील विधीसंघर्षीत बालके व त्यांचे संपर्कातील इतर अल्पवयीन असलेल्या 20 ते 25 मुलांनी सहभाग घेतला होता. सदर उपक्रमा अंतर्गत सदरचे अल्पवयीन मुले हि गुन्हेगारी कृत्याकडे न वळता त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. सदरचे अल्पवयीन मुले हि स्वतःचे पायावर उभे राहण्यासाठी व स्वतःमधील कलागुणांची ओळख करुन देण्यासाठी मुलांना पोलीस निरीक्षक श्री. महादेव वाघमोडे यांनी मार्गदर्शन करतांना सांगीतले की, अल्पवयीन मुलांनी गुन्हेगारी मार्गावरती न जाता स्वतःची ताकत ओळखुन आपल्यातील कौशल्य ओळखुन त्यांना योग्य वेळी योग्य दिशा देण्याची आवश्यकता आहे, सदर मुलांना रांजणागव MIDC पोलीस स्टेशनच्या वतीने सर्वोतोपरी सहकार्य करुन त्यांच्या कलागुणांना वाव देवुन त्यांना MIDC मध्ये रोजगाराची संधी मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले.
तसेच मिशन परिवर्तनचे श्री. योगेश जाधव अध्यक्ष कला, क्रिडा, साहित्य शांतीदुत परिवार, सौ. अनिता राठोड, सचिव तथा प्रशिक्षक यांनी देखील मुलांचे समुपदेशन करुन त्यांना नॅपकिन रुमालाचा वापर करुन फुलांचा गुच्छ, बुके, घड्याळे, माळा इ. गृहउपयोगी व शोभेच्या वस्तु कमीत कमी खर्चामध्ये तयार करुन त्यांची विक्री करुन रोजगार उभा करण्यासाठी प्रात्यक्षिक दाखवुन मुलांना वेगवेगळ्या उद्योग व व्यवसायाचे करण्याचे प्रशिक्षण दिले आहे. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अँड. तुषार दसगुडे यांनी केले.
मिशन परिवर्तनचे श्री. योगेश जाधव यांनी रांजणगाव पोलीस स्टेशनकडून त्यांना अशा प्रकारची दुस-यांदा संधी मिळाली असल्याचे सांगुन मुलांचा उत्साह व कलागुणांना वाव दिल्याने पोलीस निरीक्षक श्री. महादेव वाघमोडे यांचे विशेष आभार मानले असुन सौ. अनिता राठोड यांनी व त्यांच्या सहका-यांनी मुलांना कमीत कमी खर्चामध्ये वेगवेगळ्या गृहउपयोगी व शोभेच्या वस्तु कशा तयार करायच्या याचे प्रशिक्षण दिले आहे.
सदर प्रशिक्षणासाठी आलेले अल्पवयीन मुलांसोबत त्यांचे नातेवाईक, आई-वडील यांनी देखील रांजणगाव MIDC पोलीसांचे व मिशिन परिवर्तनेचे अधिकारी, पदाधिकारी यांचे आभार मानले असुन त्यांचे मुले यापुढे कोणत्याही गैरकृत्यामध्ये सहभागी होणार नाहीत व समाजमध्ये कष्टाने व स्वाभिमानाने जगतील असे सांगीतले. तसेच अल्पवयीन मुलांनी देखील पोलीस निरीक्षक श्री. महादेव वाघमोडे यांना यापुढे कोणत्याही प्रकारचा गुन्हा करणार नाही असे अश्वासन दिले आहे.
रांजणगाव MIDC पोलीसांनी आयोजित केलेल्या “स्पंदन” उपक्रमामुळे दिशाहिन झालेल्या अल्पवयीन मुलांना योग्य दिशा देवुन रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार असुन त्यासाठी पोलीस निरीक्षक श्री. महादेव वाघमोडे, श्री. योगेश जाधव, अध्यक्ष कला, क्रिडा, साहित्य शांतीदुत परिवार, सौ. अनिता राठोड, सचिव तथा प्रशिक्षक, रिड इंडीया चे अॅड. तुषार दसगुडे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.