दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी “आप” ची दुसरी यादी जाहीर ..
निर्भय न्यूज लाईव्ह: प्रतिनिधी

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी “आप” ची दुसरी यादी जाहीर .
नवी दिल्ली -९ डिसेंबर २०२४
आतापर्यंत “आप’ने ३१ विद्यमान आमदारांना उमेदवारी नाकारले आहे. आजच्या यादीत उल्लेखनीय नाव अवधूत ओझा यांचे राहिले. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी “आप” ने आज २० उमेदवारांची यादी जाहीर केली. यात प्रेरणादायी वक्ते अवध ओझा यांना पटपडगंज मतदारसंघातून रिंगणात उतरविले आहे. त्यांनी काही दिवसापूर्वी आप मध्ये प्रवेश केला होता.
माजी मुख्यमंत्री मनीष सिसोदिया व विधानसभेच्या उपाध्यक्ष राखी बिर्ला यांच्या मतदारसंघात बदल केले आहेत. सिसोदिया यांना जंगपुरा या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली. त्याचप्रमाणे दिल्ली विधानसभेच्या उपाध्यक्ष राखी बिर्ला यांनी मंगोलपुरी या मतदार संघाची मादीपुर मतदार संघातून निवडणूक लढणार आहेत.
“पद्मश्री” सन्मानित जितेंद्र सिंह शांट्टी यांना शहादातून उमेदवारी दिली. चांदणी चौक मतदार संघातून पुरंदर सिंग सावने यांना तर कृष्णा नगरीतून विकास बघा यांना उमेदवारी देण्यात आली. भाजपमधून आलेल्या काही जणांना उमेदवारी देण्यात आले आहे या त्रिमूर्ती मधून सुंदर पाल सिंग बिट्टू यांना उमेदवारी देण्यात आली आहे.