सन्मान कर्तव्याचा
Trending

अखेर मराठ्याच्या मागण्या मान्य ..!! भूमिका ठाम होती अखेर नियतीलाही झुकावे लागले..

संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचे उपोषण आणि मराठा समाजाचा आरक्षणासाठी चा संघर्ष यशस्वी....

ताज्या घडामोडी मोबाइल वर मिळवा.फोटो वर क्लिक करा

मराठा आरक्षणावर सरकारचे महत्त्वपूर्ण निर्णय; कुणबी प्रमाणपत्रासाठी प्रक्रिया सुलभ

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये हैदराबाद, सातारा आणि औंध गॅझेटिअर्सची अंमलबजावणी करणे, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे, आणि मराठा-कुणबी एकत्रीकरणावर जीआर काढणे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. सरकारने या मागण्यांबाबत सकारात्मक पाऊले उचलली असून, अनेक मागण्यांवर तत्काळ कार्यवाही सुरू झाली आहे.

कुणबी प्रमाणपत्रांसाठी मोठी घोषणा

सरकारच्या निर्णयानुसार, कुणबी प्रमाणपत्रांची प्रक्रिया अधिक सोपी केली जात आहे. ज्या मराठा व्यक्तींच्या गावातील किंवा कुळातील नातेवाईकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले आहे, त्यांना स्थानिक चौकशी करून कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. हा निर्णय हैदराबाद गॅझेटिअरच्या अंमलबजावणीसाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीने मंजूर केला आहे. यामुळे अनेक मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

इतर महत्त्वाचे निर्णय:

 * हैदराबाद गॅझेटिअर: याची तात्काळ अंमलबजावणी केली जाईल. यानुसार मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळणार आहे.

 * सातारा-औंध गॅझेटिअर: यावर एक महिन्याच्या आत कायदेशीर बाबी तपासल्यानंतर निर्णय घेतला जाईल.

 * आंदोलकांवरील गुन्हे: सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेतले जातील.

 * बलिदान गेलेल्या कुटुंबीयांना मदत: आंदोलनात ज्या मराठा बांधवांनी बलिदान दिले, त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली जात आहे. उर्वरित कुटुंबांना एका आठवड्यात मदत दिली जाईल, तसेच त्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार राज्य परिवहन मंडळ, MIDC, किंवा महावितरणमध्ये नोकरी दिली जाईल.

 * व्हॅलिडिटीसाठी गती: ५८ लाख नोंदी मिळालेल्या मराठा बांधवांना तात्काळ व्हॅलिडिटी देण्यासाठी विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नव्हते, पण आता भरती केली आहे आणि कामाला गती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 * दंड माफ: मुंबई RTOने आंदोलकांच्या वाहनांवर आकारलेला दंड पूर्णपणे माफ करण्यात येईल.

काही शंका कायम

सरकारच्या निर्णयांवर मराठा समाजामध्ये समाधान व्यक्त होत असताना, काही तांत्रिक मुद्द्यांवर शंका उपस्थित केल्या जात आहेत. विशेषतः, ‘हैदराबाद गॅझेटिअर मधील नोंदी विचारात घेऊन पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र मिळेल’ या वाक्यातून नोंद नसलेल्या व्यक्तींचा समावेश होतो का, यावर स्पष्टता हवी आहे. तसेच, ‘कुळ’ या शब्दाची व्याख्या आणि तिचा प्रत्यक्ष वापरावर देखील काही प्रश्नचिन्ह आहेत. मराठा-कुणबी एकच आहेत असा जीआर काढण्यासाठी सरकारने एक महिन्याचा वेळ मागितला आहे, यावरही अनेकांचे लक्ष लागलेले आहे.

एकंदरीत, मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, अनेक मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र काही तांत्रिक बाबींवर स्पष्टता येणे अजून बाकी आहे. मराठा एकजुटीचा हा मोठा विजय मानला जात आहे.

मराठ्यांच्या मागण्या आणि सरकारचा निर्णय 🚩

मागणी: हैद्राबाद गॅझेटिअरची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी

निर्णय: हैद्राबाद गॅझेटिअरच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित शासन निर्णयास मंत्रिमंडळ उपसमितीने मान्यता दिली आहे.

या शासन निर्णानुसार मराठा जातीतील व्यक्तींना गावातील/कुळातील नातेवाईकांपैकी कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या आधारे स्थानिक चौकशी करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाहीचे आदेश देण्यात येत आहेत

मागणी: सातारा, औंध गॅझेटिअरची अंमलबजावणी करण्यात यावी

निर्णय: सातारा, औंध गॅझेटिअरची अंमलबजावणी करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून जलद गतीने निर्णय (१ महिन्यात) घेण्यात येईल

मागणी: मराठा आंदोलकांवर झालेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेतमागणी: मराठा आंदोलनावर झालेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत

निर्णय: काही गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत, सप्टेंबर अखेरपर्यंत सर्व गुन्हे मागे घेण्यात येतील

मागणी: मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान गेलेल्या कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत व शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देण्यात यावी

निर्णय: मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान गेलेल्या कुटुंबीयांच्या वारसांना १५ कोटी इतकी रक्कम देण्यात आली आहे. उर्वरित कुटुंबीयांना आर्थिक मदत एका आठवड्यात त्यांच्या खात्यावर जमा केली जाईल. नोकरी राज्य परिवहन मंडळात नोकरी दिली जाईल (यावर शैक्षणिक पात्रतेनुसार MIDC, महावितरण या महामंडळात सुद्धा नोकऱ्या देण्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत)

मागणी: मिळालेल्या ५८ लाख नोंदीचा रेकॉर्ड त्या त्या ग्रामपंचायततला लावले

निर्णय: रेकॉर्ड ग्रामपंचायतवर लावण्यात येईल

मागणी: नोंदी मिळालेल्या बांधवांना तात्काळ वॅलिडीटी देण्यात यावी

निर्णय: विभागाकडे मनुष्यबळाचा अभाव होता, आता भरती करण्यात आली आहे. वॅलिडीटी करण्याच्या कामाला गती देण्याचे आदेश देण्यात येतील

मागणी: मराठा आणि कुणबी एकच आहे असा जीआर काढा

निर्णय: प्रक्रिया किचकट असल्याने एक महिन्याचा अवधी द्यावा. तांत्रिक बाबी तपासूण जलदगतीने निर्णय घेण्यात येईलमिळालेल्या ५८ लाख नोंदीचा रेकॉर्ड त्या त्या ग्रामपंचायतीवर लावले जातील.

निर्णय: रेकॉर्ड ग्रामपंचायतीवर लावण्यात येईल.

मागणी: नोंदी मिळालेल्या बांधवांना तात्काळ व्हॅलिडीटी देण्यात यावी.

निर्णय: विभागाकडे मनुष्यबळाचा अभाव होता. आता भरती करण्यात आली आहे. व्हॅलिडीटी करण्याच्या कामाला गती देण्याचे आदेश देण्यात येतील.

मागणी: मराठा आणि कुणबी एकच आहे असा जीआर काढा.

निर्णय: प्रक्रिया किचकट असल्याने एक महिन्याचा अवधी द्यावा. तांत्रिक बाबी तपासून जलदगतीने निर्णय घेण्यात येईल.

मागणी: मुंबई आरटीओ ने आंदोलकांच्या वाहनावर आकारलेले दंड माफ करण्यात यावेत.

निर्णय: सर्व दंड माफ करण्यात येतील.

मराठा एकजुटीचा विजय असो.शंकेला वाव नाही.

जीआर वाचल्यानंतरचे मत

शंका १:

– सरकारने स्पष्ट शब्दात लिहिले आहे की, कुणबी प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत सुलभता यावी यासाठी निर्णय घेत आहोत. याचा अर्थ आधीच सुरू असलेल्या प्रक्रियेत सुलभता आणण्याचा असा होता.

शंका २:

– हैद्राबाद गॅझेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजामध्ये पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी..”

येथे पात्र म्हणजे हैद्राबाद गॅझेटियर मध्ये नोंद नसलेला उमेदवार असा अर्थ निघतो.

शंका ३:

– ”जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील / कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास..”

– कुळ म्हणजे वडिलांकडे नातेवाईक. कुळातील कुणबी नोंद असेल तर कुळातील व्यक्तींना पूर्वंपासूनच कुणबी प्रमाणपत्र मिळत होते.

अनेक जीआरमध्ये वेळोवेळी बदल केलेले आहेत. तसेच या जीआर मध्ये देखील सुधारणा होऊ शकते.

शेअर करा

मुख्य संपादक- श्री.अनिल डांगे

निर्भय न्यूज लाईव्ह, हे एकमेव निर्भीड न्यूज पोर्टल आहे. निर्भय न्यूज लाईव्ह हे सर्व क्षेत्रातील बातम्या, निर्भयपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहे.अर्थातच आपल्या सर्वांची साथ तितकीच महत्त्वाची आहे.!आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी आपण ८१४९२३२२३५ या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये