क्राईम न्युज
Trending

कारेगावात पुन्हा बलात्काराची घटना! सोशल मीडियावरील ओळखीचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

निर्भय न्यूज लाईव्ह: वृत्तसेवा

ताज्या घडामोडी मोबाइल वर मिळवा.फोटो वर क्लिक करा

 कारेगावात पुन्हा बलात्काराची घटना! सोशल मीडियावरील ओळखीचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

 * सामूहिक बलात्कारानंतर पुन्हा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, कारेगावात खळबळ!

*  धमकी आणि अत्याचार; कारेगावातील घटनेने समाजमन हादरले!

खळबळजनक बातमी:

कारेगाव (प्रतिनिधी): कारेगाव तालुका शिरूर येथे एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सोशल मीडियावर झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. बालक विधी संघर्ष बालक वय 16 अल्पवयीन मुलाने पीडित मुलीला घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केला. इतकेच नव्हे, तर तिला जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिली.

 

या घटनेने कारेगाव परिसरात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच कारेगावात सामूहिक बलात्काराची घटना घडली होती, आणि आता पुन्हा अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. कारेगावात नक्की काय चालले आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा याने सोशल मीडियाच्या माध्यमातून पीडित मुलीशी ओळख वाढवली. त्यानंतर तिला घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीने घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितल्यानंतर त्यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी विधी संघर्षित मुलगा वय 16 याच्याविरुद्ध  गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले करत आहेत.

शेअर करा

मुख्य संपादक- श्री.अनिल डांगे

निर्भय न्यूज लाईव्ह, हे एकमेव निर्भीड न्यूज पोर्टल आहे. निर्भय न्यूज लाईव्ह हे सर्व क्षेत्रातील बातम्या, निर्भयपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहे.अर्थातच आपल्या सर्वांची साथ तितकीच महत्त्वाची आहे.!आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी आपण ८१४९२३२२३५ या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये