देश विदेश
Trending

दिल्लीच्या सिंगल इंजिन सरकार द्वारे वृद्धांना २५०० रुपये दिले जातील:आप

निर्भय न्यूज लाईव्ह: प्रतिनिधी

ताज्या घडामोडी मोबाइल वर मिळवा.फोटो वर क्लिक करा

दिल्लीच्या सिंगल इंजिन सरकार द्वारे वृद्धांना २५०० रुपये दिले जातील:आप

नवी दिल्ली, दिनांक २५ फेब्रुवारी २४

संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर व विधानसभेची निवडणूक फेब्रुवारीमध्ये होणार आहे त्या अनुषंगाने दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने ज्येष्ठ नागरिकांना दरमहा २५०० रुपये देणारी वृद्धत्व निवृत्ती वेतन योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

दिल्ली विधानसभेची निवडणूक फेब्रुवारीमध्ये होणार आहे. काही दिवसापूर्वी आम आदमी पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी नुकतीच घोषित करून निवडणुकी संदर्भात पक्षाची तयारी जोरदार सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून वृद्धत्व निवृत्ती वेतन योजना पुन्हा सुरू करून दिल्लीतील आणखी ८० हजार जेष्ठ नागरिकांना ही योजना लागू होणार असून, निवडणुकीआधी या आर्थिक मदतीचा दिल्लीकर ज्येष्ठांना थेट लाभ मिळणार आहे.

दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी आणि आम आदमी पक्ष समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी आज झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये आणखी ८० हजार ज्येष्ठ नागरिकांना वृद्धत्व निवृत्तीवेतन योजनेच्या लाभ घेण्याची घोषणा केली. या योजनेमुळे एकूण पाच लाख, तीस हजार ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक लाभ मिळणार असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. २०१५ मध्ये सरकार स्थापन केल्यानंतर आम्ही निवृत्त वेतनात वाढ केली होती. मी तुरुंगात गेल्यानंतर ही योजना बंद झाली होती. आता पुन्हा सुरू होत आहे.

दिल्लीतील ६० ते ६९वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना २००० रुपये ७० वर्षावरील जेष्ठ नागरिकांना २५०० रूपये पेन्शनचा लाभ दिल्लीतील जेष्ठ नागरिकांना मिळतो. रविवारपासून याबाबतचे पोर्टल कार्यान्वित झाले असून १०,००० अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत.

[भाजपच्या डबल इंजिनची सत्ता असलेल्या राज्यामध्ये ५००-१००० रू निवृत्तीवेतन मिळते. दिल्लीच्या सिंगल इंजिन सरकार द्वारे वृद्धांना २५०० रुपये दिले जातील. भाजपच्या डबल इंजिन सरकारमुळे होणारे नुकसान अधिक असल्याने दिल्लीच्या लोकांसाठी सिंगल इंजिन सरकारच योग्य आहे. 

– अरविंद केजरीवाल. –

-समन्वयक आम आदमी पक्ष

शेअर करा

मुख्य संपादक- श्री.अनिल डांगे

निर्भय न्यूज लाईव्ह, हे एकमेव निर्भीड न्यूज पोर्टल आहे. निर्भय न्यूज लाईव्ह हे सर्व क्षेत्रातील बातम्या, निर्भयपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहे.अर्थातच आपल्या सर्वांची साथ तितकीच महत्त्वाची आहे.!आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी आपण ८१४९२३२२३५ या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये