शिरूर भाजपाला मोठा धक्का जिल्हा उपाध्यक्ष मितेशजी गादिया यांनी दिला राजीनामा
निर्भय न्यूज लाईव्ह: शिरूर प्रतिनिधी

भाजपासाठी चांगले काम करणाऱ्या नेत्यांवर होणारा अन्याय सहन न झाल्यामुळे मितेश प्रदीप गादिया यांनी आपल्या ,उपाध्यक्ष -भाजपा पुणे जिल्हा उत्तर ग्रामीण या पदाचा दिला राजीनामा
ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपा उपजिल्हाअध्यक्ष मितेश गादिया यांनी दिला राजीनामा दिल्यामुळे शिरूर भाजपाला राजकीय विशलेषका मते मोठा धक्का मानला जातोय.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक जाहीर झाली असून सगळ्याच पक्षांनी आप – आपल्या कार्यकर्त्याची मोट बांधायला सुरवात केली आहे.पण शिरूर विधानसभा मतदार संघामध्ये वेगळेच चित्र पाहावयास मिळत आहे.सध्या कोणता उमेदवार तिकिटासाठी कोणत्या पक्षात प्रवेश करेन हे आता सांगता सोपे झाले आहे.! मात्र तिकिटासाठी उमेदवारी मिळवल्यानंतर त्या पक्षातील कार्यकर्ते त्या उमेदवारच काम करतील का..? हे सांगता येणं सद्या तरी खूप कठीण काम आहे.
महायुती आणि महविकास आघाडी पक्षातील कार्यकर्त्यामध्ये काहीशी गोंधळाची परिस्थिती पहावयास मिळत आहे.
मा .राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांनी भाजपा पक्ष वाढवण्यासाठी व महायुती पक्षासाठी प्रामाणिक पणे काम केलेले आहे. पुणे जिल्ह्यात व मावळ मध्ये भरपूर कार्यकर्ते जोडले व मागे झालेल्या लोकसभेसाठी व मागील पाच वर्षात त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या दिल्या होत्या, त्या त्यांनी स्वतः व त्यांच्या कार्यकर्त्यांनीही प्रामाणिकपणे पार पाडल्या.
परंतु पक्षासाठी एवढे मोठे योगदान देऊन हि त्यांच्यावर अन्याय झाला व तो सहन न झाल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला व त्यावेळी त्यांच्या डोळ्यात आलेले अश्रू ते लपवू शकले नाही.
शिरूर शहरात मितेश गादिया,गेली अनेक वर्षापासून त्यांच्याबरोबर काम करत आहेत व त्यांनी दिलेल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार ही पाडत आहेत, परंतु विधानसभा निवडणुकीत,उत्तर पुणे जिल्हा ग्रामीण महायुतीमध्ये भाजपला एक सुद्धा जागा नाही असे समजल्यानंतर व भाजपासाठी चांगले काम करणाऱ्या नेत्यांवर होणारा अन्याय सहन न झाल्यामुळे मितेश प्रदीप गादिया यांनी आपल्या ,उपाध्यक्ष -भाजपा पुणे जिल्हा उत्तर ग्रामीण या पदाचा राजीनामा दिलेला आहे.
शरद भाऊ बुट्टे पाटील, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा देत, आपण फक्त पदाचा राजीनामा देत आहोत पार्टीचा नव्हे असे मितेश गादिया यांनी निर्भय न्यूज प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
यंदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उमेदवाराला मतदासंघांतील कार्यकर्त्याची मोट बांधणे म्हणजे मोठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे