ताज्या घडामोडी
Trending

संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून दोन मराठा सेवक उद्यापासून बेमुदत आमरण उपोषणाला बसणार..

निर्भय न्यूज लाईव्ह:शिरूर प्रतिनिधी

ताज्या घडामोडी मोबाइल वर मिळवा.फोटो वर क्लिक करा

 

संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून दोन मराठा सेवक उद्यापासून बेमुदत आमरण उपोषणाला बसणार.

मराठा आरक्षण व इतर मागण्यासाठी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी २५ जानेवारी २०२५ शनिवार पासून आंतरवाली सराटी येथे सहकारी कार्यकर्त्या समवेत सामूहीक आमरण उपोषण सुरू केले आहे.

मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी आरक्षण घेण्यासाठी आम्ही आता माघार घेणार नाही , असे आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलन करते संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. 

त्याच आंदोलनास पाठिंबा म्हणून मराठा समाजाचा घटक म्हणून समाजाचा आम्ही काही तरी देणे लागतो या भावनेतून मराठा सेवक अनिल किसन डांगे व सावळाराम दादा आवारी २८/०१/२५ रोजी मंगळवार पासून तहसिल कार्यालय,शिरूर आवारात मराठा आरक्षण व इतर मागण्यासाठी आमरण उपोषणास सकाळी १०:०० वाजता बसत आहे.

त्याच अनुषंगाने या दोन युवकांनी आज तहसील कार्यालय व शिरूर पोलीस स्टेशनमध्ये येथे निवेदन देत आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे.

प्रमुख मागण्या

– सगेसोयरेची अंमलबजावणी करावी

– मराठा आंदोलकांवर दाखल केलेले सर्व गुन्हे मागे घ्यावेत 

– हैद्राबाद, सातारा, बॉम्बे गव्हर्नमेंट, औंध संस्थानचे गॅझेटिअर्स लागू करावे

– आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या मराठा बांधवांच्या कुटुंबियांना दिली जाणारी आर्थिक मदत सरकारने बंद केली आहे. ती सुरु करावी व कुटुंबातील एका सदस्याला प्रशासकीय सेवेत रुजू करून घ्यावे

– स्व.संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निष्पक्षपातीपणे तपास करून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा करण्यात यावी. 

– तसेच स्व. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस जबाबदार आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी.

एक मराठा.. लाख मराठा!

शेअर करा

मुख्य संपादक- श्री.अनिल डांगे

निर्भय न्यूज लाईव्ह, हे एकमेव निर्भीड न्यूज पोर्टल आहे. निर्भय न्यूज लाईव्ह हे सर्व क्षेत्रातील बातम्या, निर्भयपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहे.अर्थातच आपल्या सर्वांची साथ तितकीच महत्त्वाची आहे.!आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी आपण ८१४९२३२२३५ या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये